Former Corporator Raju Dindorle News :   Kolhapur News :
Former Corporator Raju Dindorle News : Kolhapur News : Sarkarnama

Kolhapur Former Corporator: माजी नगरसेवकावर नागरिकांनी केला फुलांचा वर्षाव; प्रशासक असलेल्या पालिकेतून...

Former Corporator Raju Dindorle News : प्रशासक राज असलेल्या महापालिकेत कामासाठी पाठपुरावा..

Former Corporator Raju Dindorle News : कोल्हापूरमधील माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे. महापालिकेवर सद्या प्रशासक राज आहे. यामुळे पालिकेचा कारभार प्रशासकाकडे आहे. निवडणुका अजूनही कधी होणार याबाबत संदिग्धता आहे. मात्र माजी नगरसेवक असतानाही राजू दिंडोर्ले यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

Former Corporator Raju Dindorle News :   Kolhapur News :
Balu Dhanorkar News : जायंट किलर बाळू धानोरकरांचा अखेरचा प्रवास सुरू, थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार !

कोल्हापूर शहरातील आपटे नगर प्रभागातील माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यावर स्थानिक नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक आहे. नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर निवडणुका न झाल्याने अनेक प्रभागांची काम रखडलेली आहेत. अशातच गेल्या वीस वर्षा पासून साळुंखे नगर परिसरातील रस्ता झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले होते.

Former Corporator Raju Dindorle News :   Kolhapur News :
Medical Colleges : केंद्र सरकारची धडक कारवाई; 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द, तर 150 रडारवर..

महापालिकेवर प्रशासकाची सत्ता असताना, आणि आपण आता माजी नगरसेवक आहोत याची पुरती जाणीव असतानाही, माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी रस्त्याच्या कामासाठी स्वत:ला झोकून दिले.

प्रशासक राज असलेल्या महापालिकेकडे पाठपुरावा करत 8 लाख रुपये निधी मंजूर करून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे भारावून गेलेल्या स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचे आभार मानत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com