PM Narendra Modi, Manmohan Singh Sarkarnama
देश

Manmohan Singh News : मनमोहन सिंग यांचे मोदींवर टीकास्त्र; म्हणाले, पदाची प्रतिष्ठा कमी करणारे पहिले पंतप्रधान...

PM Narendra Modi : मनमोहन सिंग यांनी मोदींनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानांचा समाचार घेतला. त्यांचे विधाने खूपच असंसदीय होती, अशी टीका माजी पंतप्रधानांनी केली आहे.

Rajanand More

Lok Sabha Election 2024 Update : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh News) यांनी मतदारांना लिहिलेल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. प्रचारादरम्यानची मोदींची भाषा असंसदीय असल्याचे माजी पंतप्रधानांनी म्हटले आहे. या पत्रात खासकरून पंजाबमधील मतदारांना त्यांनी आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान मनमोहन सिंग यांच्या काही वर्षांपुर्वीच्या मुस्लिमांविषयी एका विधानाचा संदर्भ दिला होता. त्यावरही त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माजी पंतप्रधानांनी पत्रात म्हटले आहे की, मोदींनी खूप घृणास्पद, विद्वेषक भाषणे केली. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि या पदाचे गांभीर्य कमी करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. (Manmohan Singh Election Campaign)

कोणत्याही पंतप्रधानांनी यापुर्वी एखाद्या विशिष्ट समाजाला निशाणा बनवण्यासाठी इतकी असंसदीय आणि खालच्या स्तराची भाषा वापरली नाही. त्यांनी माझ्याविषयी काही चुकीची विधाने केली आहेत. मी माझ्या जीवनात कधीही एका समाजाला दुसऱ्यापासून वेगळे केले नाही. ही भाजपची (BJP) सवय असल्याचा हल्लाबोल मनमोहन सिंग यांनी केला. (PM Narendra Modi Speech)

सध्या भारत (India) महत्वाच्या टप्प्यावर आहे. अंतिम टप्प्यातील मतदान हे लोकशाही आणि संविधान सुरक्षित करण्यासाठी शेवटची संधी आहे. पंजाबी बलिदानासाठी ओळखले जातात. सद्भावना, सौदार्ह्य आणि लोकशाही व्यवस्थेवरील आपला विश्वास या महान राष्ट्राचे संरक्षण करू शकते. भाजपने मागील दहा वर्षात पंजाब आणि पंजाबियतला बदनाम करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही, अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली आहे. (Latest Political News)

पंजाबमधील 750 शेतकरी शहीद झाली. दिल्लीतील सीमांवर शेतकरी महिनो-महिने वाट पाहत राहिले. सरकार त्यांच्यावर हल्ले केले. शेतकऱ्यांना संसदेत आंदोलनजीवी आणि परजीवी म्हटले गेले, याबाबतही मनमोहन सिंग यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. मोदींनी 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. उलट उत्पन्नात घट झाल्याचीही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मोदी सरकारच्या धोरणांवरही माजी पंतप्रधानांनी टीका केली. मागील दहा वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत कल्पनाही करू शकत नाही, एवढी उलथापालथ पाहायला मिळाली. नोटबंदी, चुकीच्या पध्दतीने जीएसटीची अंमलबजावणी, कोरोना काळात लॉकडाऊनच्या निर्णयामुळे दयनीय स्थिती बनली. भाजप सरकारच्या काळात जीडीपी विकास दर सहा टक्क्यांपेक्षा कमी राहिला. काँग्रेसच्या काळात हा दर आठ टक्के होता, असे मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT