Arvind Kejriwal News : केजरीवालांची धडपड थांबेना; सुप्रीम कोर्टाच्या नकारानंतर उचललं 'हे' पाऊल

Delhi Liqour Scam Case : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आजच सुनावणी होणार आहे.
Arvind Kejriwal, Supreme Court
Arvind Kejriwal, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Rouse Avenue Court : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दोन जूनला तिहार जेलमध्ये सरेंडर व्हावे लागणार आहे. अंतरिम जामीनाची मुदत वाढवावी, यासाठी त्यांनी मंगळवारी कोर्टात अर्ज केला होता. पण हा अर्ज दाखल करून घेण्यास कोर्टातील रजिस्ट्रार कार्यालयाकडून नकार देण्यात आला. त्यानंतर केजरीवालांनी गुरूवारी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात धाव घेतली आहे.

केजरीवाल हे दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam Case) प्रकरणी मार्च महिन्यापासून तिहार तुरुंगात होते. काही दिवसांपुर्वी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) त्यांना लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी एक जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला.

Arvind Kejriwal, Supreme Court
Maharashtra Election Update : बारामती, चंद्रपूर, नाशिक, अमरावती..! सट्टा बाजारात कुणाची चलती?

कोर्टाने दिलेली मुदत आता तीन दिवसांत संपणार असल्याने पुन्हा जेलमध्ये जावे लागू नये, यासाठी केजरीवालांची धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात जामीन अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर आजच सुनावणी होणार आहे. (Latest Political News)

कोर्टाने तातडीने सुनावणी घेऊन केजरीवालांना जामीन मंजूर केल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागणार नाही. मात्र, त्यावर एक जूनपूर्वी निकाल न आल्यास पुन्हा जेलमध्ये जावे लागेल. त्यामुळे या सुनावणीवरच केजरीवालांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास केजरीवालांना पुन्हा सुप्रीम कोर्टात जावे लागेल. (Arvind Kejriwal Bail Plea)

दरम्यान, केजरीवाल यांनी अंतरिम जामीनाची मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रकृतीचे कारण दिले होते. जेलमध्ये असताना वजन वाढले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे आरोग्य तपासणी करता आली नाही. या तपासण्या सध्या सुरू आहेत. त्यामुळे पुढील तपासण्यांसाठी कालावदी लागणार आहे. त्यासाठी अंतरिम जामीनाची मुदत सात दिवस वाढवून द्यावी. नऊ जूनला जेलमध्ये सरेंडर करू, असे केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जात म्हटले होते.

Arvind Kejriwal, Supreme Court
Shashi Tharoor News : सोने तस्करीतील व्यक्तीशी संबंधांबाबत शशी थरूर यांची कबुली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com