Rahul Gandhi Manoj Parmar neha Parmar sarkarnama
देश

Manoj Parmar Suicide : 'भाजपमध्ये असता तर ही वेळ आली नसती', 'ईडी'मुळे पती-पत्नीची आत्महत्या; राहुल गांधींना भेट देणं भोवलं?

Manoj Parmar Suicide ED Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान एका मुलाने त्यांना पिगी बँक भेट दिली होती. मनोज आणि नेहा परमार यांचा तो मुलगा होता.

Roshan More

Manoj Parmar Suicide : ईडीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मनोज परमार आणि त्यांची पत्नीने नेहा यांनी गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना मध्यप्रदेशमधील सीहोर जिल्ह्यातील आष्टा येथील आहे. मनोज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) समोर आली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान एका मुलाने त्यांना पिगी बँक भेट दिली होती. मनोज आणि नेहा परमार यांचा तो मुलगा होता. तेव्हापासूनच भाजपाने त्यांना लक्ष्य केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसचे मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्षांनी मनोज परमार यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची भेट घेतली.

एका राष्ट्रीयकृत बँकेची सहा कोटींची फसवणूक प्रकरणी मनोज परमार यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. पाच डिसेंबरला ईडीकडून परमार यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता तसेच त्यांची मालमत्ता जप्त केली होती. आत्महत्येपूर्वी मृत मनोज परमारने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे की ईडीने माझ्या घरावर छापा टाकला.

ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. काही कागदपत्रांसह घरात ठेवलेले 10 लाख रुपये व 70 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी घेतले. परमान यांनी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले आहे की हे 10 लाख त्यांनी दोन दिवसांपूर्वी त्ंयाचे नातेवाईक दिनेश परमार यांच्याकडून घेतले होते. मात्र, ईडीच्या पंचनाम्यात 10 लाख जप्त केल्याचा उल्लेख नाही.

...तर कारवाई झाली नसती

मनोज परमार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, घराच्या झडतीदरम्यान ईडीचे अधिकारी संजीत कुमार साहू यांनी त्यांचे पाय माझ्या खांद्यावर ठेवले आणि ही तुझी लायकी आहे, असे म्हटले. तसेच तू भाजपमध्ये असता तर तुझ्यावर कारवाई झाली नसती, असे देखील ईडीचा अधिकारी म्हणाला.

राहुल गांधींच्या विरोधात व्हिडिओ करा

मनोज परमार यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर राहुल गांधींच्या विरोधात व्हिडिओ बनवायला सांगितला तसेच तो अपलोड करायला सांगितले. तुम्हाला जन्मभर जामीन मिळणार नाही, अशी धमकी देखील दिली. मनोज परमान यांनी आपल्या मुलांची काळजी राहुल गांधी यांनी घ्यावी, असे देखील सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT