.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Panaji News : काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळण्याच्या गोवा विधानसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांना या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्याची सूचना केली.
"निवडून आलेल्या आमदाराचा मूळ राजकीय पक्ष इतर कोणत्याही राजकीय पक्षात विलीन झाल्यास, सदस्य अपात्र होणार नाही. मग तो विलीनीकरणासोबत असो वा असहमत असो. विलीनीकरणाच्या बाबतीत अपात्रतेचे नियम लागू होणार नाहीत, असा निर्णय सभापती रमेश तवडकर यांनी चोडणकर यांची याचिका फेटाळून लावताना दिला होता.
दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस आणि राजेश फळदेसाई या आठ आमदारांनी सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या आमदारांनी केलेले पक्षांतर अवैध असल्याचा दावा करत त्यांना अपात्र ठरविण्यासाठी गिरीश चोडणकर यांनी ही याचिका दाखल केली होती.
दरम्यान, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची काँग्रेसची याचिका फेटाळली होती. त्यानंतर ही अपात्रता याचिका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याठिकाणी ही याचिका फेटाळली असून या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्याची सूचना केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.