Kolhapur Politics: 10 पैकी 10 आमदार निवडून दिलेल्या कोल्हापुरातही शिंदे मंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला वापरणार?

Mahayuti Government : भाजप अपक्षासह तीन , जनसुराज्य दोन, शिवसेना तीन आणि राष्ट्रवादीला एक असे संख्याबळ झाले असताना त्याला किती कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद मिळणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
kolhapur Politics
kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दहा आमदार निवडून आल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राजर्षी शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह शिवसेनेने (Shivsena) चार जागांवर बाजी मारली. राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर यांना संधी मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मंत्रिपदासाठी अडीच- अडीच वर्षांचाच फॉर्म्युला वापरणार का अशी चर्चा कोल्हापुरच्या राजकारणात जोर धरू लागली आहे.

महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपमधून आमदार विनय कोरे की अमल महाडिक यांना मंत्रिपद मिळणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेची संभाव्य मंत्रीपदाची समोर आली आहे. या संभाव्य मंत्रिपदामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अडीच अडीच वर्षांसाठी मंत्री पद निश्चित केल्याचे सांगितले जाते.

शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य राज्यमंत्रिपदांमध्ये प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर या दोघांपैकी एक मंत्री मंडळात जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आबिटकर यांचे पारडे सध्या तरी जड आहे.

kolhapur Politics
Maharashtra Politic's : मंत्रिपदाचा पत्ता कट झालेल्या तानाजी सावंतांनी ‘या’ नेत्यासोबत घेतली एकनाथ शिंदेंची भेट

तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील मंत्रीपदावर दावा केला होता. मात्र संभाव्य यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र यड्रावकर या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या निमित्ताने तत्कालीनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधानगरीवासियांना प्रकाश अबिटकर यांना मंत्री करा, नामदार करतो असे आवाहन शिंदे यांनी केले होते.

त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊन तो शब्द पूर्ण केला जाणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. तर आघाडी सरकारमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर आरोग्य राज्यमंत्री होते. त्यामुळे यड्रावकर यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी दिली जाणार का? याकडे लक्ष असेल.

kolhapur Politics
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेसला झटका; गोव्यातील आमदार अपात्रता याचिका फेटाळली

भाजप अपक्षासह तीन , जनसुराज्य दोन, शिवसेना तीन आणि राष्ट्रवादीला एक असे संख्याबळ झाले असताना त्याला किती कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद मिळणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास मिळालेल्या महाविकास आघाडीला मात्र विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली. महायुतीला दहा पैकी दहा जागांवर यश मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com