Supreme Court Latest Marathi News
Supreme Court Latest Marathi News Sarkarnama
देश

अखेर महाराष्ट्रातील राजकीय पेच पोहचला सर्वोच्च न्यायालयात

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तसेच शिवसेनेसमोरही मोठं राजकीय संकट उभं ठाकलं आहे. शिंदे यांनी शिवसेनेतील 40 हून अधिक आमदार फोडले असल्याने मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आता याचसंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. (Eknath Shinde Latest News)

शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पाच वर्षे निवडणूक बंदीची कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर 29 जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश महिला काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा संदर्भ देत जया ठाकूर यांनी याचिकेत म्हटलं आहे की, हे प्रकरण गंभीर आहे. अपात्र आणि राजीनामा देणाऱ्या आमदारांना पाच वर्षे निवडणुका लढता येणार नाहीत, असा निर्णय द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे राजकीय पक्षे हे आपल्या लोकशाहीच्या तत्वांना पुन्हा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारांचे पक्षांतर घटनाबाह्य आहे. राजकीय पक्ष भ्रष्ट आचरण आणि घोडेबाजारात मग्न आहेत, असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे.

सतत पक्ष बदलल्याने सरकारी संपत्तीचे नुकसान होते. कारण सातत्याने पोटनिवडणुका घ्याव्या लागतात. मतदारांना एक समान विचारधारा असलेले प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाते. या याचिकेमध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील राजकीय स्थितीचेही उदाहरण देण्यात आलं आहे.

ही याचिका 2021 मध्ये त्यांनी आधी दाखल केलेल्या याचिकेअंतर्गतच दाखल केली आहे. आधीच्या याचिकेमध्ये 2021 मध्येच न्यायालयाने केंद्र सरकारला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. नव्याने दाखल याचिकेमध्ये राजकीय पक्ष स्थितीचा फायदा उठवत असल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT