Rahul Gandhi Sarkarnama
देश

Maratha Reservation : आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेबाबत राहुल गांधींची मोठी घोषणा

Rajanand More

Bharat Jodo Nyay Yatra : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर ओबीसी समाजातील नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मर्यादेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशभरात आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. (Maratha Reservation)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झारखंडमध्ये मोठी घोषणा केली आहे. केंद्रात इंडिया आघाडीची (India Alliance) सत्ता आल्यानंतर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल. तसेच संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही त्यांनी केली.

सध्या नियमानुसार 50 टक्क्यांची मर्यादा असल्याने त्यापेक्षा अधिक आरक्षण दिले जाऊ शकत नाही. पण काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर ही मर्यादा आमचे सरकार हटवेल. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दलित, आदिवासी आणि इतर मागावर्ग प्रवर्गातील लोकांना मजूर बनविण्यात आले आहे. मोठ्या कंपन्या, रुग्णालये, महाविद्यालये, कोर्टात त्यांना भागिदारी मिळत नाही. त्यासाठी आमचे पहिले पाऊल देशात जातनिहाय जनगणना हे असेल, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. ते म्हणाले, मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत. पण जेव्हा जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यात आली तेव्हा त म्हणाले इथे केवळ दोनच जाती आहेत, श्रीमंत आणि गरीब. जेव्हा ओबीसी, दलित, आदिवासींना हक्क देण्याची वेळ येते तेव्हा मोदी म्हणतात, कोणतीही जात मानत नाही. पण निवडणुकीवेळी म्हणतात मी ओबीसी आहे, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT