Congress and EVM : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'EVM'बाबत काँग्रेसने उचलले 'हे' पाऊल!

Ravindra Dhangekar and Election Commission : कसबा निवडणुकीवेळी रवींद्र धंगेकरांनी केलेली 'ही' मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली होती.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election and Pune Congress : निवडणुका आल्या की EVM मशीन आणि त्याबाबतच्या चर्चांना उधाण येतं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. EVMमशीन मॅनेज करून सत्ताधारी निवडणुका जिंकत असल्याचा आरोप नेहमीच विरोधी पक्षाकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने EVMविरोधात आपला लढा नव्याने सुरू केला असून सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे.

पुणे काँग्रेस(Congress) कडून'ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ,दिनांक छापली जावी 'या मागणीसाठी काँग्रेस नेते एड.अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी सर्वोच्च नायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी.पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर 2 फेब्रुवारी ही याचिका दाखल झाली असून 7 फेब्रुवारी रोजी ही याचिका सुनावणीसाठी येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress
Pune News : शिंदेंचे खासदार अन् भाजप आमदारामध्ये 'टेंडर'वरून वाद; अधिकाऱ्यांवर दबाब...

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला, केंद्र सरकारला नोटीस बजावली असून 7 फेब्रुवारी रोजी त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे . काँग्रेस नेते अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांच्या वतीने अभय अनिल अंतुरकर, अ‍ॅड. सुरभी कपूर आणि अ‍ॅड.असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. काँग्रेस नेते अ‍ॅड.अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

निवडणुकांमध्ये वापरले जाणारे ईव्हीएम(EVM) मशीन मध्ये ज्या व्हीव्हीपॅट स्लिप येतात, त्यावर झालेल्या प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी,अशी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. 2019 च्या निवडणुकीत स्लिपवर वेळ आणि तारीख छापली जात नव्हती. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करूनही ती मान्य झाली नव्हती.

Congress
Sharad Pawar : शरद पवारांचा शिलेदारच म्हणाला 'ही' तर अफवा...

निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाच्या तारीख, वेळेसह स्लिप छापून मिळावी, अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर वेळोवेळी अंमलबजावणी झालेली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सरकार आणि निवडणूक आयोगाने ताळमेळ राखत तज्ज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मतदान केलेली तारीख आणि वेळ नमूद करून स्लिप मिळणे हा मतदाराचा अधिकार आहे. मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक होण्यासाठी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्लिपचे कार्य विश्वासार्ह असले पाहिजे, त्यात सुधारणा झाली पाहिजे,असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे .

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com