BJP  Sarkarnama
देश

MP Assembly Elections: १२ उमेदवारांचे विजयाचे मार्जिन हजाराच्या आत

Sachin Waghmare

Madhya Pradesh Assembly Election : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांत यश संपादन करीत भाजपचा पराभव केला होता. विशेषतः मध्य प्रदेशातील काही मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

मध्य प्रदेशातील १२ जागेवर विजयाचे मार्जिन एक हजारच्या आत राहिले आहे. ३० मतदारसंघांत एक ते पाच हजार इतके विजयाचे मार्जिन दोन्ही उमेदवारात राहिले आहे. विशेषतः एका मतदारसंघात भाजप उमेदवाराने केवळ २८ मताने विजय मिळवला.

शाजापूर या विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अरुण भिमावाड यांनी काँग्रेस उमेदवार कराडा हुकूमसिंह यांच्यावर केवळ २८ मतांनी विजय मिळवला आहे, तर इंदौर विधानसभा मतदारसंघातील भाजप (Bjp) उमेदवार रमेश मेंडोला यांनी काँग्रेस उमेदवार चिंटू चौकसे यांच्यावर तब्बल १ लाख ७ हजार ४७ इतक्या सर्वाधिक मताधिक्यांनी विजय मिळवला.

कमी मताधिक्याचा फायदा काँग्रेसला

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत १२ मतदारसंघांतील विजयी व पराभूत उमेदवारांचे मताधिक्य हे एक हजाराहून कमी आहे. या १२ मतदारसंघांपैकी ९ ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे, तर ३ ठिकाणी भाजप उमेदवार विजयी झाला. त्यामुळे कमी मताधिक्याचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मताधिक्य खालीलप्रमाणे :

१ हजारहून कमी – १२ मतदारसंघ

१००१ ते ३००० – १७ मतदारसंघ

३००१ ते ५००० – १३ मतदारसंघ

५००१ ते १०,००० – २३ मतदारसंघ

१०,००१ ते १५,००० – २८ मतदारसंघ

१५,००१ ते २०,००० – २९ मतदारसंघ

२०,००१ ते ३०,००० – ४९ मतदारसंघ

३०,००१ ते ४०,००० – २८ मतदारसंघ

४०,००१ ते ५०,००० – १८ मतदारसंघ

५०,००१ ते ७५,००० – १६ मतदारसंघ

७५ हजारहून अधिक – ४ मतदारसंघ

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT