Jalgaon : दहा वर्षे तेलंगणाच्या गादीवर बसल्यानंतर यंदाही जनता आपल्याच पारड्यात सत्ता देईल, असा विश्वास मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना होता. परंतु, काँग्रेस व भाजपने केलेल्या आरोपांवर चंद्रशेखर राव हे उत्तर देण्यात कमी पडले. यातूनच चंद्रशेखर राव यांचा पराभव झाला आहे, पण येत्या चार महिन्यांत बीआरएस पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर यांनी व्यक्त केला आहे.
तेलंगणा पक्षाच्या पराभवाबाबत ते म्हणाले, "पक्षाने त्या ठिकाणी सत्तेवर असताना चांगले काम केले आहे. परंतु काही लोक फुटून काँग्रेस पक्षात गेले आहेत, परंतु हेच लोक काँग्रेस पक्षाला सत्तेत काम करू देणार नाहीत, हे परत फुटून बीआरएस पक्षात सामील होतील व पुन्हा पक्षाची सत्ता येईल."
"पक्षाचे नेते के. चंद्रशेखरराव यांच्यावर आजही जनतेचा विश्वास आहे. आमचाही त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा पराभव झाला असला तरी आपण त्याच पक्षात काम करून पक्ष वाढविणार आहोत. आता पक्षनेते के. चंद्रशेखर राव यांना पक्ष कार्य करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. ते महाराष्ट्रात अधिक वेळ देऊन आपला पक्ष वाढवून जनतेचा विश्वास संपादन करतील," असे लक्ष्मण पाटील म्हणाले.
एखादी घोषणा जेव्हा संपूर्ण प्रचाराचा केंद्रबिंदू बनते आणि त्यामुळे जनतेत त्या घोषणेची चर्चा होऊन प्रचाराला मोठी मदत होते हे भारतीयांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनुभवले आहे. अब की बार मोदी सरकार ही घोषणा प्रचाराची केंद्रबिंदू ठरली होती. तेलंगणातील कॉंग्रेस प्रचारात महत्त्वाची ठरलेली घोषणा म्हणजे बाय बाय के.सी.आर. काँग्रेसने संपूर्ण प्रचारात ही घोषणा वापरली. आणि त्याचा अपेक्षित परिणामही दिसून येत आहे.
दक्षिण भारतातील कर्नाटक या राज्यानंतर तेलंगणा या दुसऱ्या महत्त्वाच्या राज्यात सत्ता स्थापन केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्व कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवार, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रेवंथ रेड्डी यांच्या समर्थकांनी रेवंथ अण्णा जिंदाबाद जय काँग्रेस आणि सर्वात महत्त्वाची घोषणा बाय बाय केसीआरच्या घोषणा देत विजयोत्सव साजरा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.