Latest Photo of New Parliament building
Latest Photo of New Parliament building Sarkarnama
देश

New Parliament Building Inauguration: '28 मे' तारीख उद्घाटनासाठी निवडण्यामागे आहे 'खास' कारण ?

सरकारनामा ब्यूरो

New Parliament Building : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी '28 मे' ला नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. संसदेच्या नवीन इमारतीविषयी संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. संसदेची नवीन इमारत उद्धाटनासाठी तयार असून, उद्घाटनासाठी 28 मे ही तारीख का ठरली आहे. पण 28 तारीख उद्घाटनासाठी का निवडली ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ही तारीख निवडण्यामागे 'खास' कारण सांगण्यात येत आहे.

काय आहे खास कारण?

मोदी सरकारला (Modi Government ) सत्तेत येऊन ( आज ) 26 मे ला नऊ वर्ष पूर्ण झाले. नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi) याच दिवशी '26 मे' ला पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. तसेच '30 मे' ला दुसऱ्यांदा शपथ घेतली होती. मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचे कार्यक्रमही 30 मे रोजी अधिकृतपणे सुरू होतील, मग नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी 28 मे ही तारीख का निवडली गेली? या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित होते. अशी चर्चा होत आहे.

विशेष म्हणजे 28 मे ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. सावरकरांचा जन्म 28 मे 1883 ला झाला होता. यंदा त्यांची 140 वी जयंती साजरी होणार आहे. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्घाटन हा निव्वळ योगायोग आहे, की सुनियोजित योजना आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (New parliament building inauguration program)

कशी आहे संसद भवन?

1927 ला ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेले जुने संसद भवन भारताच्या 97 वर्षांच्या राजकीय इतिहासाचे साक्षीदार आहे. परंतू संसदेची जुनी इमारत आता जुनी झाली असून जीर्ण झाली असून, सोयी-सुविधा देखील कमी पडत आहेत. 5 ऑगस्ट 2019 ला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी संसदेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारला विनंती केली होती. यानंतर 10 डिसेंबर 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले नवीन इमारत स्वावलंबनाचे प्रतिक आहे. संसदेची नवनिर्मित इमारत भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करण्याचे काम करेल. यासोबतच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे सभासदांना त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.

दरम्यान, नवीन संसद भवन ( Parliament House) ही त्रिकोणी आकाराची चार मजली इमारत आहे. संपूर्ण कॅम्पस 64,500 चौरस मीटरचा आहे. नव्या संसद भवनात ज्ञानद्वार शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे तीन मुख्य दरवाजे असणार आहेत. नवीन संसद भवन टाटा समूहातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने बांधले आहे. गुजरातमधील आर्किटेक्चर फर्म 'एचसीपी'कंपनीने नवीन संसदेचे डिझाइन तयार केले आहे. या इमारतीचे मुख्य 'आर्किटेक्ट' बिमल पटेल आहेत. या संसद भवनाची निर्मिती टाटा प्रोजक्टने 862 करोड रुपयांमध्ये केली आहे. या संसदेत 888 सदस्य बसू शकतात. तसेच राज्यसभेत 384 सदस्य बसू शकणार आहेत.

Edited by - Rashmi Mane

SCROLL FOR NEXT