Impact on Meghalaya Democratic Alliance and coalition balance : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांपूर्वीच ईशान्य भारतातील तीन राज्यांचा दौरा केला. मागील दोन वर्षांत अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडलेल्या मणिपूरसह मिझोराम आणि आसाममध्येही त्यांनी हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. मोदींचा ईशान्य भारतातील हा दौरा आटोपतचा तीन दिवसांत मेघालयातील राजकारणात उलथापालथ सुरू झाली आहे.
नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील 12 पैकी 8 मंत्र्यांनी मंगळवारी एकाचवेळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले आहे. या मंत्र्यांमध्ये बहुतेक जण वरिष्ठ नेते असून एनपीपीएसह भाजपच्या मंत्र्यांचाही त्यात समावेश आहे.
विशेष म्हणजे एनपीपीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या उपस्थितीतच या मंत्र्यांनी राज्यपालांकडे आपले राजीनामे सोपविले. या राजीनाम्यांमागे मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलण्याची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री किंवा सरकारमधील इतर मंत्र्यांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये एनपीपीचे अम्पारीन लिंगडोह, कामिंगोन यम्बोन आणि राक्कम ए. संगमा, यडीपी पक्षाचे अबू ताहीर मंडल, पॉल लिंगडोह आणि किरमेन शायला, भाजपचे के. एल. हेक आणि एचएसपीडीपी पक्षाचे शकलियार वारझरी यांचा समावेश आहे. 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत एनपीपीने सर्वाधिक 26 जागा जिंकल्या आणि संगमा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार अस्तित्वात आले होते.
मेघालय सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 12 पेक्षा अधिक मंत्री असू शकत नाहीत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांना आता विस्तारामध्ये संधी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी असला तरी सरकारने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. नाराज नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जात आहे. त्याचप्रमाणे जातीय समीकरणेही विचारात घेतली जात आहेत. विस्तारामध्ये तरूण चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाण्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.