Iran us tensions : इस्त्राईल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे सध्यातरी युध्द थांबण्याची चिन्हे नाहीत. याउलट युध्दामुळे जगावर इंधन व गॅस तुटवड्याचे गंभीर संकट घोंघावू लागले असून भारतासह अनेक देशांमध्ये त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यातच आता इराणने जगाला हादरविणारा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुजवर ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर काही तासांतच इराणने ट्रम्प यांच्यासह जगाला इशारा दिला आहे. इराणने म्हटले आहे की, आमच्यावर हल्ला सुरूच राहिल्यास पश्चिम आशियातून एक लिटर तेलही जहाजातून नेऊ दिले जाणार नाही.
इराणने दिलेला हा इशारा जगाला धडकी भरविणार आहे. कारण असे झाल्यास संपूर्ण जगावर इंधन तुटविड्याचे मोठे संकट उभे राहील. जगातील विविध देशांना निर्यात होणाऱ्या इंधनाचा २० टक्के वाटा होर्मुज सामुद्रधुनीतून निर्यात होतो. ट्रम्प यांनी इराणला इशारा देणारा म्हटले आहे की, त्यानी काही वाईट के तर इराणचा शेवट होईल. इराणचे नावही तुम्हाला परत ऐकायला मिळणार नाही. होर्मुज सामुद्रधुनी आता खुली आहे, पण ती ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणही आक्रमक झाला आहे.
काय आहे होर्मुज सामुद्रधुनी?
होर्मुज सामुद्रधुनी ओमान आणि इराणमध्ये आहे. उत्तरेकडील आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी आणि पलीकडे अरबी समुद्राशी जोडणारा हा प्रमुख समुद्री मार्ग आहे. सर्वात अरुंद ठिकाणी ती केवळ ३३ किमी रुंद आहे. तर दोन्ही दिशेने शिपिंग लेन फक्त ३ किमी रुंद आहे.
मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार दररोज सरासरी २० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल, गॅस आदी या सामुद्रधुनीतून जात होते. युध्दामुळे या वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक जहाजे अडकून पडली आहे. भारतावरही त्याचा परिणाम झाला असून गॅसची तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असून त्याचा सर्वाधिक फटका हॉटेल उद्योगाला बसू लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.