Congress MLA : काँग्रेसला धक्का, नेत्याची आमदारकी रद्द; कोर्टाने भाजपच्या माजी मंत्र्यांना केले विजयी घोषित...

Vijaypur MLA news, MP High Court decision MLA : न्यायमूर्ती जी. एस. अहलूवालिया यांच्या खंडपीठाने रावत यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोप मान्य केले.
BJP Congress
BJP CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress MLA disqualified news : विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीनंतर पराभूत उमेदवारांकडून विजयी उमेदवारांच्या उमेदवारी अर्जातील त्रुटींवर आक्षेप घेत कोर्टात निवडणूक याचिका दाखल केली जाते. मात्र, बहुतेक याचिका कोर्टाकडून पुराव्यांअभावी किंवा तांत्रिका बाबींमुळे फेटाळून लावल्या जातात. क्वचितच विजयी उमेदवाराची निवड रद्द केली जाते. पण आज काँग्रेसच्या एका आमदाराला आपल्या पदावर पाणी सोडावे लागल्याचे समोर आले आहे.

मध्य प्रदेशातील विजयपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार मुकेश मल्होत्रा यांना कोर्टाने झटका दिला आहे. ग्वाल्हेर हायकोर्टाने त्यांची निवड रद्द केली आहे. तर याचिकाकर्ते आणि पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे माजी मंत्री रामनिवास रावत यांना विजयपूरचे नवे आमदार व म्हणून करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

भाजपचे नेते रामनिवास रावत यांनी मल्होत्रा यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले होते. मुकेश मल्होत्रा यांनी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना गुन्ह्यांविषयीची माहिती लपविल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला होता. मल्होत्रा यांच्याविरोधात सहा गुन्हे दाखल असताना त्याचा उल्लेख शपथपत्रात करण्यात आला नव्हता, असे याचिकेत म्हटले होते.

BJP Congress
Om Birla News : मोठी बातमी : ओम बिर्ला यांचा अध्यक्षांच्या आसनावर न बसण्याचा निर्णय! लोकसभेत पहिल्यांदाच घडलं असं, सरकार-विरोधकांमध्ये घमासान

न्यायमूर्ती जी. एस. अहलूवालिया यांच्या खंडपीठाने रावत यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोप मान्य केले. शपथपत्रामध्ये महत्वाची माहिती लपविणे हे निवडणूक कायद्याचे उल्लंघन आहे, असे कोर्टाने स्पष्ट करत त्यांची निवड रद्द करून रावत यांना आमदारकी बहाल केली.

दरम्यान, रावत हे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळवले. त्यानंतर विजयपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होती. पण या निवडणुकीत रावत यांचा पराभव होतो. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

BJP Congress
Ramdas Athawale : रामदास आठवले यांच्या संपत्तीत 12 वर्षांत किती टक्के वाढ? दागिने, जमीन किती? वाचा सविस्तर...

मल्होत्रा यांनी रावत यांना पराभूत केले होते. पराभवानंतर रावत यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. विशेष म्हणजे मुकेश मल्होत्रा हेही २०२३ च्या आधी भाजपच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. २०२३ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. रावत भाजपमध्ये गेल्यानंतर मल्होत्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांच्याविरोधात पोटनिवडणूक लढविली होती. आता कोर्टाच्या निकालामुळे रावत यांना थेट आमदारकी मिळणार आहे. विजयपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही. हायकोर्टाच्या या निकालाविरोधात काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाऊ शकते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com