Goa BJP Sarkarnama
देश

GOA Politics: 20 लाख द्या, फाईल क्लिअर करा! भाजपला घरचा आहेर, माजी मंत्र्यानं पक्षश्रेष्ठींसमोर डागली तोफ

राज्यातील जनता या सरकारला खाली खेचण्याची वाट पाहत आहेत. या सरकारमध्ये काहीच योग्य पद्धतीने सुरु नाहीये. सर्व मंत्री पैसे मोजण्यात व्यग्र आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Panaji: महाराष्ट्रात महायुतीचे काही नेते अडचणीत असताना आता गोव्यातील भाजपच्या माजी मंत्र्यानं घरचा आहेर दिला आहे. आपल्याच पक्षातील मंत्र्यावर त्यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे गोव्यातील सत्ताधारी भाजपला तावडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी हा आरोप केला आहे.

विरोधक सत्ताधारी नेत्यांवर भष्ट्राचाऱ्याचे आरोप करीत आहे. अशातच त्यात आणखीभर टाकून भाजपच्या माजी मंत्र्यानं केल्याने गोव्याचं राजकारण तापलं आहे. "एक फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्यांला १५ ते २० लाख रुपये दिले," असा गंभीर आरोप करुन मडकईकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील जनता या सरकारला खाली खेचण्याची वाट पाहत आहेत. या सरकारमध्ये काहीच योग्य पद्धतीने सुरु नाहीये. सर्व मंत्री पैसे मोजण्यात व्यग्र आहेत. राज्यात भ्रष्टाचार नव्हे तर लूट सुरुये, असे घणाघात मडकईकर यांनी केला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०२२)भाजपने तिकिट नाकारल्याने नाराज असलेल्या मडकईकरांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अर्धसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधक भाजपवर तुटुन पडले आहेत.पांडुरंग मडकईकर म्हणाले, "माझी तब्येत ठिक नसल्याचे कारण देत २०२२ मध्ये मला तिकिट नाकारण्यात आले. लवकर बरे व्हा तुम्हाला योग्यपद दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. भाजप पुन्हा सत्तेत आले आणि मला विसरले. त्यासाठी आज मी मला पद मिळेल का असा प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो,"

"पुढील आठवड्यापर्यंत मी वाट पाहणार असून, त्यानंतर निर्णय घेईन. मी २०२७ च्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. भाजपने तिकिट नाकारल्यास, मी या पक्षा रहायचे की नाही? याबाबत निर्णय घेईन. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड यासारखे पक्ष माझ्या संपर्कात आहेत. मी योग्य निर्णय घेईन. भाजपकडून मला याबाबत कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे," असे मडकईकर यांनी माध्यमांना सांगितले. मडकईकरांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री सावंत यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT