Walmik Karad News: मुंडेंच्या राजीनाम्यानंतर SIT च्या तपासाला वेग; वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात

Walmik Karad Latest News : वाल्मिक कराड यांच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज यापूर्वीच विशेष तपास पथकाने एसआयटी (SIT) दाखल केला होता.
Valmik Karad
Valmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Beed News: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या तपासाला वेग आहे.

देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्याच्या एसआयटीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बीडसह राज्यात काही ठिकाणी त्यांची संपत्ती असल्याची माहिती आहे.

Valmik Karad
BSP Chief Mayawati: IAS बनण्याचे स्वप्न अपूर्ण, पण IAS अधिकारी त्यांना करीत होते 'सलाम'; मायावतींचा राजकीय प्रवास जाणून घ्या!

वाल्मिक कराड यांच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज यापूर्वीच विशेष तपास पथकाने एसआयटी (SIT) दाखल केला होता. आता एसआयटीने वाल्मिक कराडची ही सर्व मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. वाल्मिक कराड यांच्या महागड्या गाड्या जप्त करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com