The BJP has alleged bogus voting at a polling station in Haveri district during the Karnataka Legislative Council graduate constituency election. Sarkarnama
देश

Haveri MLC election : पदवीधर निवडणुकीत जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या पत्नी आशा पाटील यांच्या नावावर बोगस मतदान; भाजपच्या आरोपाने खळबळ

Karnataka graduate constituency election, Congress district president, Sanjeevkumar Neeralagi, Asha Patil : हावेरी तहसीलदार मतदान केंद्रातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनही हादरले आहे. शिल्पा बादम्मनवर या आशा पाटील यांच्या नावावर बोगस मतदान करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Rajanand More

BJP allegations : कर्नाटक विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या पत्नीच्याच नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक आरोप भाजपने केला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हावेरी जिल्ह्यात बोगस मतदान झाल्याचे भाजपने म्हटले आहे. बोगस मतदान केलेली महिला मंत्र्यांसोबत मतदान केंद्रात जाताना दिसत असल्याचा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे.

कर्नाटकातील हावेरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजीवकुमार नीरलागी यांच्या पत्नी आशा पाटील यांचे मतदान दुसऱ्या महिलेने केल्याचा आरोप होत आहे. भाजपने दावा केला आहे की, काँग्रेसची महिला कार्यकर्ता शिल्पा बादम्मनवर यांनी हावेरी तहसीलदार कार्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आशा पाटील यांच्या नावाने बोगस मतदान केले.

कर्नाटक सरकारमधील मंत्री रुद्रप्पा लमाणी हेही संबंधित महिलेसोबत मतदान केंद्रात प्रवेश करताना दिसले होते, असा गंभीर आरोपही भाजपने केला आहे. याप्रकरणी भाजपने काँग्रेसला घेरले असून संबंधित दोषी अधिकारी तसेच पक्षातील नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, वाद समोर आल्यानंतर नीरलागी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नीरलागी यांनी सांगितले की, 'माझी पत्नी आजारी होती. तिच्या नावावर कुणी मतदान केले, हे मला माहिती नाही. तिच्या नावावर मतदान करण्यात आल्याची माहिती आपल्याला शुक्रवारी रात्री समजली. आम्ही मतचोरीविरोधात मोहिम चालवत असताना असे झाले असेल तर ते धक्कादायक आहे. अधिकाऱ्यांनी मतदान ओळखपत्र न पाहता मतदान करण्याची परवानगी कशी दिली?, असा सवालही नीरलागी यांनी केला आहे.

दरम्यान, हावेरी तहसीलदार मतदान केंद्रातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनही हादरले आहे. शिल्पा बादम्मनवर या आशा पाटील यांच्या नावावर बोगस मतदान करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबत अद्याप आपल्याकडे तक्रार आली नसल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी विजय महंतेश दानम्मनवर यांनी सांगितले. व्हिडिओ आणि कागदपत्रांची तपासणी केली जात असून त्यावरून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT