Mallikarjun Kharge controversial remark : 'मोदी असे जाणार नाहीत', तरुणाच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना भर कार्यक्रमात खर्गेंची जीभ घसरली; म्हणाले, बाप भी जायेगा!

Congress, BJP, Mallikarjun Kharge controversial remark, PM Narendra Modi : मल्लिकार्जून खर्गे यांचे भाषण सुरू असतानाच सभागृहात बसलेल्या एका व्यक्तीने पंतप्रधान मोदी कुठेच जाणार नाहीत, असे विधान केले. त्यावर कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला.
Kharge controversial statement Modi reaction
Kharge controversial statement Modi reactionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress president latest news : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. पटना येथील एका कार्यक्रमात बोलताना खर्गे यांच्या भाषणादरम्यान एका तरुणाने अडथळा आणला. ते मत चोरीवर बोलत असतानाच या तरुणाने मोदी असे जाणार नाहीत, असे विधान केले. त्याला प्रत्युत्तर देताना खर्गेंनी थेट 'मोदी का बाप भी जायेगा', असे वादग्रस्त विधान केल्याने राजकारण तापले आहे.

बिहारचे पहिले मुख्यमंत्री डॉ. श्रीकृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्यादरम्यान खर्गे यांनी हे विधान केले आहे. खर्गे यांनी भाषणादरम्यान केंद्र सरकार, भाजप, आरएसएस आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करतानाच काही राज्यांमध्ये मतचोरीच्या माध्यमातून बनविण्यात आलेली सरकारे हटविण्याचीही मागणी केली.

खर्गे यांचे भाषण सुरू असतानाच सभागृहात बसलेल्या एका व्यक्तीने पंतप्रधान मोदी कुठेच जाणार नाहीत, असे विधान केले. त्यावर कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. त्या व्यक्तीच्या विधानाने संतापलेल्या खर्गेंनी वादग्रस्त विधान केले. तर उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला धक्काबुक्की करत सभागृहातून बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे.

Kharge controversial statement Modi reaction
भाजपच्या तिकीटावर 29 व्या वर्षी आमदार, आता 'या' महिला नेत्या थेट राष्ट्रीय राजकारणात

दरम्यान, खर्गे यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी खर्गेंसह राहुल गांधींवरही निशाणा साधला. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, मल्लिकार्जून खर्गेंनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे पहिल्यांदाच घडले नाही. यापूर्वीही मोदींच्या कुटुंबाविषयी काँग्रेसने अपशब्द वापरले आहेत. कधी त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरले, तर कधी त्यांना मौत का सौदागर म्हटले, तर कधी चहावाला म्हणत त्यांच्या गरिबीची थट्टा केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष रोज असभ्यतेच्या मर्यादा ओलांडत आहे.

Kharge controversial statement Modi reaction
Rahul Gandhi latest news : भाजपचे आभार, पुढील सात दिवसही असाच उत्साह असूद्या! राहुल गांधींनी डिवचलं, काय होणार आहे सात दिवसांत?

मागील १२ वर्षांत सातत्याने निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याने काँग्रेस पक्षात निराशा वाढली आहे. त्यांच्याकडे ना कोणते धोरण आहे ना कोणता मुद्दा. केवळ शिवीगाळ करण्याचे राजकारण उरले आहे. जनाधार हरविलेल्या काँग्रेसचा आता कार्यकर्त्यांचा आधारही संपत चालला आहे. त्यांनी जेव्हा-जेव्हा मोदी किंवा त्यांच्या कुटुंबाबाबत अपशब्द वापरले आहेत, तेव्हा-तेव्हा जनतेने त्यांना करारा जवाब दिला आहे, असे शाह म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com