Bihar sets new record as 70% of voters cast their votes online in the recent elections.  sarkarnama
देश

Mobile E Voting : मोठी बातमी! बिहार निवडणुकीत ऑनलाईन मतदान; घरूनच 70 टक्के मतदारांनी बजावला हक्क!

E Voting Bihar Election : बिहार राज्याच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितले की, मतदानासाठी खास अ‍ॅप तयार करण्यात आले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून एकाच मोबाईलवरून दोघे जण मतदान करू शकतात.

Roshan More

E Voting News : बिहारमध्ये पार पडलेल्या सहा नगरपालिका निवडणुकीमध्ये इतिहास रचला गेला. प्रथमच मोबाईलद्वारे अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांनी मतदान केले. ई-मतदानासाठी पात्र मतदारांपैकी तब्बल 70 टक्के मतदारांनी मतदान केले.तर, मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्यांपैकी केवळ 54.63 टक्के जणांनी मतदान केले.

मोबाईलद्वारे अ‍ॅपच्या माध्यमातून पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारणमधील सहा नगरपालिका निवडणुकांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. याच वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे मोबाईलद्वारे मतदानाचा हा प्रयोग देशभर चर्चेचा विषय ठरला आहे.

बिहार राज्याच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितले की, मतदानासाठी खास अ‍ॅप तयार करण्यात आले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून एकाच मोबाईलवरून दोघे जण मतदान करू शकतात. ही ई-मतदानाची सुविधा जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत त्यांचीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामध्ये जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला और स्थलांतरित मजूर यांचा समावेश होतो.

बिहार विधानसभा निवडणुकीतही ऑनलाईन मतदानाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तसेच 2029 पर्यंत होणाऱ्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये या प्रणालीचा वापर केली जाण्याची शक्यता आहे.

ई-मतदानासाठी नोंदणी आवश्यक

ई-मतदान करण्याच्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी आधीच नोंदणी करणे आवश्यक होते. नगरपालिका निवडणुकीसाठी 51 हजार 155 मतदारांनी नोंदणी केली होती. ज्यामध्ये 26 हजार 38 पुरुष मतदार आणि 25 हजार 117 महिला मतदारांचा समावेश होता. दरम्यान, नोंदणी केलेल्या एकुण मतदारांपैकी 70 टक्के मतदारांनी मतदान केले.

ई-मतदान अ‍ॅपचे वैशिष्ट

एका मोबाइल क्रमांकावरून दोनच मतदार मतदान करू शकतात. त्यांनी दिलेले मत 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानामुळे सुरक्षित राहते त्यात बदल होत नाही. लॉगिन, मतदानाच्या वेळी मतदारांची ओळख पडताळण्यासाठी 'फेस रीडिंग' तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. व्हीव्हीपॅट यंत्रणेप्रमाणे दिलेल्या मतांची पडताळणी मतदाराला शक्य होते'डिजिटल लॉक सिस्टिम'मुळे 'ईव्हीएम' स्ट्राँगरूमला सुरक्षा प्रदान केली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT