Female Ministers in Modi Sarkar Sarakarnama
देश

Modi Cabinet Portfolio Announcement : 'मोदी 3.0' मंत्रिमंडळातील 'नारी'शक्ती सांभाळणार 'ही' महत्त्वाची खाती!

Mayur Ratnaparkhe

Female Ministers in Modi Sarkar : नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळास सुरुवात झाली. मोदींसोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील 71 जणांचा शपथविधीही झाला. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर झाले.

यामध्ये पंतप्रधान मोदींनी(PM Modi) त्यांच्या कोअर टीममधील मंत्र्यांकडे याआधी असलेल्या विभागांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे दिसून आले. तर अनेकांना या कार्यकाळात खाते बदलून दिले गेले आहे. याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 7 महिलांचा समावेश आहे. यापैकी सहा जणींना विविध खात्यांची जबाबदारी दिली गेली आहे.

यामध्ये सर्वातप्रथम पंतप्रधान मोदींच्या कोअर टीममधील सदस्य आणि मोदी सरकारमध्ये याआधी अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांचा क्रमांक आहे. त्यांना पंतप्रधान मोदींनी यावेळीही अर्थ मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. अन्नपूर्णा देवी यांच्याकडे महिला बालविकास मंत्रालय सोपवलं गेलं आहे. अनुप्रिया पटेल यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री करण्यात आलं आहे.

याशिवाय शोभा करंदलाजे यांना सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, तसेच श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. तर सावित्री ठाकूर यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रालयाचे राज्यमंत्री पद दिले गेले आहे.

नीमुबेन बंभानिया यांना ग्राहक, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली गेली आहे. तर महाराष्ट्रातील जामनेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे(Raksha Khadse) यांच्याकडे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कॅबिनेट मंत्र्यामध्ये भाजपचे एकूण 25 मंत्री -

मोदी सरकार 3.0 मधील एकूण कॅबिनेट मंत्र्यांमध्ये 25 भाजपचे आहेत आणि 5 मंत्रिपदं मित्र पक्षांना दिलं गेलं आहे. तर स्वतंत्र प्रभारासह पाच खासदारांना राज्यमंत्री बनवलं गेलं आहे. ज्यामध्ये तीन भाजपचे, जयंत चौधरीच्या रुपाने एक आरएलडी आणि प्रतापराव जाधव हे एक शिवसेनेचे खासदार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT