New Delhi : केंद्रात 2014 2024 रोजी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचं बहुमतातलं सरकार सत्तेत आल्यापासून आजपर्यंत केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांचा धडाकाच सुरू असल्याचे दिसून येतं. पण या कालावधीत सर्वाधिक धसका ईडी (अंमलबजावणी संचालनालय) चाच घेतला गेला. राजकीय वर्तुळात ईडीच्या कारवायांमुळे एकच खळबळ उडाल्याचे अनेकदा दिसून आलं. आता याच ईडीबाबत (ED) मोदी सरकारनं संसदेत धक्कादायक माहिती दिली आहे.
ईडीच्या छापेमारीमुळे विरोधी पक्षातील अनेक नेते राजकीय नेते अडचणीत आले.काहींनी कारवाई आणि चौकशीची ससेमिरा सोडवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेशही केला.तर विरोधकांनी सरकारवर ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स अशा विविध केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. पण आता खुद्द केंद्र सरकारनेचं ईडीच्या गेल्या 10 वर्षांतील कारवायांबाबत मोठी माहिती संसदेत दिली आहे.
ईडीच्या कारवायांमुळे अनेक सरकारी नेत्यांना चांगलाच घाम फोडला होता. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांपाठीमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू लागल्याचंही दिसून आलं. मात्र,आता विरोधकांच्या ईडीबाबतचा दावा चर्चेत येण्यात शक्यता आहे वापर हा राजकीय दबावासाठी केला जातो असा आरोप नेहमीच विरोधी पक्षांकडून केला जातो.
संसदेच्या अधिवेशनात सीपीआयएम पक्षाचे राज्यसभा खासदार ए ए रहीम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाकडून ईडी कारवायांबाबतची माहिती देण्यात आली.मागच्या 10 वर्षांत 193 राजकीय नेत्यांवर ईडीनं कारवाईचा बडगा उचलला असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 193 पैकी अवघ्या दोनच प्रकरणातील नेते दोषी आढळले आहेत.
मोदी सरकारच्या (Modi Government) दुसर्या टर्ममध्ये म्हणजे अर्थातच 2019 ते 2024 या कालावधीत ईडी कारवायांचा वेग वाढल्याचं समोर येत आहे. त्यात 2023-2024 या वर्षात सर्वात जास्त 32 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागच्या पाच वर्षांत ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी साडेसहाशेहून अधिक कारवाया केल्याची माहिती समोर आली.त्यात फक्त 42 केसेसमध्ये संबंधित दोषी आढळल्याचं समोर आलं आहे.
आत्तापर्यंत ईडीकडून आपचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदिया,सत्येंद्र जैन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन , तर महाराष्ट्रातील नवाब मलिक,अनिल देशमुख,संजय राऊत,अनिल परब,प्रफुल पटेल,आनंदराव आडसूळ,भावना गवळी,प्रताप सरनाईक,रोहित पवार,यांसारख्या यांच्यासह अनेक नेत्यांवर कारवाई केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.