Pune News, 19 Mar : इस्लाम धर्मात पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सध्या सुरू आहे. त्यानिमित्त मुस्लिम (Muslim) समाजाकडून महिनाभर रोजे केले जातात. मात्र, एकीकडे हे हेच रोजे सुरू असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाकडून जकातच्या नावावार जवळपास हजार कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुस्लिमांसाठी जकात महत्त्वाचा मानला जातो. याच जकातसाठी उत्तर प्रदेशातील काही लोक महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पाठवले जातात. मात्र, या लोकांनी जकातच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक केल्याचा दावा काही मुस्लिम संघटनानी केली आहे.
मुस्लिम धर्मातील मान्यतेनुसार मदिनामध्ये पैगंबरांनी जकात सुरू केल्यानंतर तिथली गरिबी दूर झाली होती. त्यामुळे मुस्लिम धर्मात जकातला विशेष महत्व आहे. मात्र, आता याच जकातच्या नावाखाली पुण्यातील मुस्लिम समाजाची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. तर आता रमजानच्या काळात पुण्यात (Pune) बेकायदेशीरपणे पैसे गोळा करणाऱ्या 30 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हे जकात गोळा करणारे लोक ना मौलाना आहेत ना मदरशातील विद्यार्थी, तरीही त्यांनी जकातच्या नावावर पैसे उकळल्याचा दावा पुण्यातील काही मुस्लिमांनी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे 2023 मध्ये या फसवणुकीसंदर्भात मुस्लिम बांधवांनी केंद्रीय गृह सचिवांना एक पत्रही पाठवलं होतं.
या पत्रात जकातच्या नावावर गोळे केलेले पैसे देशविरोधी कारवायांसाठी वापरले जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली होती. तर जकातच्या नावावर दरवर्षी फक्त महाराष्ट्रात सुमारे साडे दहा हजार कोटींची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ज्या मदरशांना पैशांची गरज आहे. त्या परिसरातील मुस्लिम कुटुंबियांकडून जकात मागणं अपेक्षित असतं. मात्र पुण्यातील काही मदरशातून जकात गोळा करण्यासाठी काही लोकांना इतर राज्यात पाठवल्याचं समोर आलं आहे. जकात धार्मिकतेशी जोडला असल्याने मुस्लिम लोक मदरशांसाठी काही लाखांत पैसे देतात.
त्याचाच गैरफायदा घेत केवळ महाराष्ट्रात ही फसवणूक 10 हजार कोटींच्या आसपास केल्याचा दावा काही मुस्लिम संघटकांकडूनच केला जात आहे. या फसवणुकीचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जकात गोळा केल्याचं दिसत आहे. तर जकात प्रणाली ही मुस्लिम समाजातील लोकांना गरजूंच्या मदतीसाठी द्यावी लागणारी देणगी आहे. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक जकात मानला जातो.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.