Dhananjay Munde-Ajit Pawar
Dhananjay Munde-Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांचे माजी सहाय्यक आता अजितदादांचे खासगी सचिव....

Dhananjay Munde Resignation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्विकारत त्यांना कार्यमुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली होती.
Published on

Beed News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे यांची आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी 'एक्स'वरून जोरदार टीका केली. 'राजकारणात काहीच अंतिम नसते, फक्त सोयीची समीकरणं असतात' असे भामरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी त्यांच्या शिफारसींवरून १४ मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव म्हणून डॉ. प्रशांत भामरे यांची नियुक्ती झाली.

आपचे नेते विजय कुंंभार यांनी संदर्भात ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव! मुंडेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेलेले भामरे आता पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी. राजकारणात काहीच अंतिम नसतं, फक्त सोयीची समीकरणं असतात असं म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री/ मंत्री यांच्या कार्यालयीन आस्थापनेवर त्यांच्या शिफारशीवरुन संबंधित मंत्री कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Dhananjay Munde-Ajit Pawar
Santosh Deshmukh Case : '...तर नक्कीच त्याच्याकडे पुरावे असणार', धनंजय देशमुखांचा दावा

यापूर्वी भामरे हे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे सहाय्यक होते. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री मुंडे यांच्यावर आरोप झाले. यानंतर धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी पदाचा राजीनामा दिला.

यानंतर अजित पवार यांचे खासगी सचिव म्हणून भामरे यांची नियुक्ती झाल्यानंतर विजय कुंभार यांनी जोरदार टीका केली. 'मुंडेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेलेले भामरे आता पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी' अशी टीका कुंभार यांनी केली.

Dhananjay Munde-Ajit Pawar
Sangli Politics : भाजपच्या बालेकिल्ल्यावर अजितदादांचा सर्जिकल स्ट्राईक; चार माजी आमदार गळाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com