Cockroach Janata Party appoints three spokespersons: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आपल्या तीन अधिकृत प्रवक्त्यांची घोषणा केली आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली. पक्षाच्या वतीने हे तीन प्रवक्ते माध्यमे आणि जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पक्षाने पत्रकार आणि सामाजिक विषयांवर अभ्यास करणारे सौरव दास यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया तसेच आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांनाही प्रवक्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, देशातील राजकीय चर्चेला नवी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न असून, नव्या पिढीतील नेतृत्व या मोहिमेला पुढे नेणार आहे. सौरव दास हे पत्रकारितेतील अनुभवासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे कायदा, न्यायव्यवस्था आणि सामाजिक प्रश्नांशी संबंधित विषयांवर संशोधन, विश्लेषण आणि वृत्तांकन केले आहे.
तसेच 2025 मध्ये दिल्लीतील प्रदूषणविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय भूमिका बजावल्याचे पक्षाने नमूद केले आहे. सोशल मीडियावर त्यांचे सुमारे 90,200 फॉलोअर्स आहेत. मुख्य प्रवक्तेपदाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी देशातील तरुणांच्या अपेक्षा, भविष्याबाबतच्या चिंता आणि बदलाची गरज यावर भाष्य केले.
दुसरे प्रवक्ते विजेता दहिया हे राजकीय संशोधन आणि धोरणात्मक विश्लेषण क्षेत्रातील अनुभव आहे. लेखक, कंटेंट क्रिएटर आणि चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी विविध प्रकल्पांमध्ये काम केले आहे. त्यांनी दोन लोकप्रिय पुस्तके लिहिली असून काही हरियाणवी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. सोशल मीडियावर त्यांचे सुमारे 5,000 फॉलोअर्स आहेत.
आशुतोष रांका हे पक्षाचे तिसरे प्रवक्ते आहेत. त्यांनी आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रात काम केल्यानंतर ते भारतात परतले.
पर्यावरण, शिक्षण आणि युवकांशी संबंधित विविध जनआंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. सोशल मीडियावर त्यांचे जवळपास 3,000 फॉलोअर्स आहेत. या तिन्ही चेहऱ्यांच्या माध्यमातून कॉकरोच जनता पार्टीने तरुण, अभ्यासू आणि विविध क्षेत्रांचा अनुभव असलेले नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.