Pune Water Crisis : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पुढील आठवड्यापासून 'एक दिवसाआड' पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव!

Pune dam water levels and supply concerns: 'एल-निनो' आणि 'आयओडी'च्या प्रभावामुळे निर्माण होणारी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने आधीच महापालिकेला १५ टक्के पाणी कपात करण्याचे पत्र दिले होते. दरवर्षी खडकवासला प्रकल्पातील पाणी ३१ जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन केले जाते.
Pune Water Supply Crisis
Pune Water Supply CrisisSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 04 Jun : यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे मोठे संकट ओढवले आहे. धरणामधील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका आता खडबडून जागी झाली असून, पुढील आठवड्यापासून शहरात 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले असून, सर्व कार्यकारी अभियंत्यांना आपापल्या भागाचे मायक्रो-प्लॅनिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने २९ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, यंदा देशात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सरासरीच्या केवळ ९० टक्के म्हणजेच सामान्यापेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे.

'एल-निनो' आणि 'आयओडी'च्या प्रभावामुळे निर्माण होणारी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने आधीच महापालिकेला १५ टक्के पाणी कपात करण्याचे पत्र दिले होते. दरवर्षी खडकवासला प्रकल्पातील पाणी ३१ जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन केले जाते. मात्र, यंदाची गंभीर परिस्थिती पाहता हा साठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरवणे क्रमप्राप्त आहे.

Pune Water Supply Crisis
Dombivli Politics : विधान परिषदेची धामधूम सुरू असतानाच शिंदेंनी डाव टाकला; भाजप नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही, "पाणीकपातीचे नियोजन महापालिकेने केले नाही, तर त्याचा फटका पुणेकरांना बसेल," असा स्पष्ट इशारा दिला होता. सुरुवातीला राजकीय कारणांमुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला आता अखेर कपातीचा निर्णय घ्यावा लागत आहे.

धरणांमधील सद्यस्थिती आणि गणिते

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये सध्या अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे.सध्याचा एकूण पाणीसाठा हा ५.७२ टीएमसी म्हणजेच केवळ १९.६३ टक्के इतका राहिला असून शहराची मासिक गरज सव्वा ते दीड टीएमसी पाणी लागते. १५ टक्के पाणी का कपात लागू झाल्यास २५० ते ३०० एमएलडी पाणी दररोज कमी केले जाईल.

Pune Water Supply Crisis
Nashik MLC Politics : महाजनांच्या खेळीने गणेश गीतेंची माघार, तरीही शिंदेसेनेच्या नरेंद्र दराडेंचा करेक्ट 'कार्यक्रम' होणार?

महापालिकेकडून नियोजनाची तयारी सुरू

संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. जर 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा लागू झाला, तर शहराच्या कोणत्या भागात कोणत्या वारी आणि कशा पद्धतीने पाणी दिले जाईल, याचे अंतिम नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आपापल्या क्षेत्राचा सविस्तर आराखडा त्वरित सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून या कपातीची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याने, पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा जपून आणि काटेकोर वापर करावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com