Nashik MLC Election : संकटमोचक महाजनांच्या मिशनला अर्धे यश ; नाशिकमध्ये गोकुळ गिते नॉट रिचेबल, नरेंद्र दराडेंपुढे आव्हान कायम राहणार?

Gokul Gite not reachable in Nashik MLC election: भाजपचे गणेश गिते यांनी निवडणुकीत माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यांचे बंधू गोकूळ गिते हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे महायुतीचे नरेंद्र दराडेंपुढे आजून आव्हान कायम आहे.
Girish Mahajan mission in Nashik election
Girish Mahajan mission in Nashik electionSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election: नाशिक विधान परिषद निवडणुकीत आज उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर भाजपचे गणेश गीते निवडणुकीतून माघार घेण्यास तयार झाले आहेत. मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे नॉटरिचेबल असून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

त्यामुळे महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यापुढे आजूनही गोकूळ गिते यांचे आव्हान कायम आहे. आपण गोकुळ यांची समजूत काढणार असल्याचे गणेश गिते यांनी म्हटलं आहे.

काल गणेश गिते यांनी माघार घ्यावी ही मागणी करण्यासाठी स्वत: शिवसेनेचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले उदय सामंत हे नाशिकमध्ये आले होते. मात्र गणेश गिते व गोकूळ गिते दोघांपैकी एकासोबतही त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांनंतर सामंतांनी गिरीश महाजन यांना साद घालत गिते बंधूंची माघार घेऊन दराडे यांचा विजय सुककर करावा अशी विनंती केली.

मंत्री गिरीश महाजन जे सांगतील तो निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल अशी भूमिका गणेश गिते यांनी घेतली होती. महाजन यांनी काल गितेंनी मुंबईत बोलावून घेतलं होतं. मुंबईतील एका ठिकाणी गिरीश महाजन व गणेश गीते यांच्यात बराचवेळ चर्चा झाली.

या बैठकीत गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांना येत्या काळात तुमचे योग्य राजकीय पुनर्वसन करु, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता गिरीश महाजन यांच्या विनंतीचा मान राखत अखेर गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं सांगितलं आहे.

Girish Mahajan mission in Nashik election
Nashik MLC Election : अनिल कदम अर्ज भरण्याच्या तयारीत होते पण.. ठाकरे सेनेने अखेरच्या क्षणी नाशिकच्या रिंगणातून माघार का घेतली?

गणेश गिते यांची माघार होत असल्याने महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, त्यांच्यासाठी हा आनंद तात्पुरता ठरण्याची शक्यता आहे. कारण गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे गणेश गीते हे माघार घेत असले, तरी त्यांचे बंधू अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.

Girish Mahajan mission in Nashik election
MLC Election : नाशिक शिवसेना तर संभाजीनगर, जळगाव दोन्हीकडे भाजप लढण्याची शक्यता.. पाहा संभाव्य यादी

गणेश गीते यांनी गोकूळ गिते हे आपल्याशी देखील संपर्कात नाही. घरी गेल्यानंतर भावाची समजूत काढणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे संकटमोचक महाजनांच्या मिशनला नाशिकमध्ये अर्धे यश आले असले तरी ते पूर्ण यशस्वी झालेले नाही. गोकूळ गिते यांनी माघार न घेतल्यास नरेंद्र दराडे यांच्या पुढे तगडे आव्हान उभे राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com