मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांना आता खास कारणासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजांसाठी अधिक वेळ मिळणार आहे.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांच्या महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक गरजांसाठी, ही रजा विशेषतः वृद्ध आईवडिलांची देखभाल करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.
केंद्रीय सिव्हिल सेवा (रजा) नियम, 1972 अंतर्गत 30 दिवसांची अर्जित रजा, 20 दिवसांची अर्धवेतन रजा, 8 दिवसांची आकस्मिक रजा आणि 2 दिवसांची प्रतिबंधित रजा एका वर्षात दिली जाते. या व्यतिरिक्त, वैयक्तिक कारणांसाठी इतर पात्र रजाही घेता येतात.
जरी सरकारने स्वतंत्र 'Sick Care Leave' जाहीर केलेली नसली, तरी सध्याच्या नियमांतर्गत ही सुविधा अप्रत्यक्षपणे उपलब्ध आहे. डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
सरकारने ही रजा वैयक्तिक कारणांसाठी दिली आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक कारणे किंवा अन्य कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी विश्रांतीची गरज भासल्यास तो ही सुट्टी घेऊ शकतो. या रजेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती 'भरपगारी' असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वेतन कपात होणार नाही, ही सर्वांत मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कर्मचारी वर्गात स्वागत होत असून, हे पाऊल कर्मचार्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं जात आहे. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे कर्मचार्यांना मानसिक ताण कमी होऊन काम व कुटुंब यामध्ये समतोल राखता येईल. हे धोरण कर्मचारी कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
या निर्णयाचा लाभ देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार असून, भविष्यात इतर राज्य सरकारेही यापासून प्रेरणा घेऊन असेच निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारी नोकरीतील कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या लक्षात घेता, ही रजा अनेकांसाठी वरदान ठरणार आहे.
प्रश्न 1: ही भरपगारी सुट्टी किती दिवसांची आहे?
उत्तर: कर्मचाऱ्यांना एकूण 30 दिवसांची भरपगारी रजा दिली जाईल.
प्रश्न 2: ही सुट्टी कोणत्या कारणासाठी आहे?
उत्तर: ही सुट्टी कर्मचाऱ्यांच्या खास वैयक्तिक/कौटुंबिक गरजांसाठी आहे.
प्रश्न 3: ही सुट्टी कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहे?
उत्तर: सर्व केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही रजा लागू होईल.
प्रश्न 4: या सुट्टीदरम्यान वेतनात कपात होईल का?
उत्तर: नाही, या सुट्टीसाठी संपूर्ण वेतन मिळेल.