
मोदी सरकारने 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने' ला मंजुरी दिली आहे.
ही योजना 100 जिल्ह्यांत राबवली जाणार असून 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
यामध्ये शेतीचे आधुनिकीकरण, सिंचन, साठवणूक व कर्ज सुलभतेसाठी 36 योजना समाविष्ट आहेत.
PM Dhan Dhanya Krishi Yojana 2025 : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना' या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 24,000 कोटी कोटी रुपये खर्च केला जाणार असून, पंतप्रधान धन धन कृषी योजनेला मंजुरी दिली, ज्यामध्ये 36 योजनांचा समावेश असेल. देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
सरकारच्या या योजनेअंतर्गत 1.7 कोटी शेतकऱ्यांच्या पीक उत्पादकतेला मदत केली जाईल. या योजनेमुळे शेतीचे आधुनिकीकरण होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत, ज्या राज्यांमध्ये पीक उत्पादन कमी आहे अशा शेतकऱ्यांना फायदा होईल.
कमी पीक उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. याशिवाय, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर उत्पादन साठवणूक वाढवणे, सिंचन सुविधा सुधारणे आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जांची उपलब्धता सुलभ करणे हे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे शेतकऱ्यांची शेती अधिक आधुनिक होईल, उत्पादनक्षमता वाढेल आणि उत्पन्नातही वाढ होईल. योजनेच्या माध्यमातून पीक कापणीनंतर साठवणूक सुविधा वाढवली जाणार आहे, सिंचनाच्या सुविधा सुधारल्या जातील आणि एकूणच कृषी उत्पादनात वाढ होईल.
या योजनेमध्ये देशातील 100 जिल्ह्यांचा समावेश असून, पुढील सहा वर्षे राबवली जाणार आहे. यामध्ये आधीच्या 36 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, मंत्रिमंडळ बैठकीत हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक मंजूर झाली असून, यामुळे सौर, वाऱ्याच्या आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांना चालना मिळेल. या निर्णयामुळे देशातील शेती आणि पर्यावरणपूरक ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
प्रश्न: ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ म्हणजे काय?
उत्तर: ही केंद्र सरकारची नवी कृषी योजना असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता व उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
प्रश्न: या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे?
उत्तर: एकूण 24,000 कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे.
प्रश्न: योजनेचा लाभ कोणाला होणार आहे?
उत्तर: देशभरातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
प्रश्न: ही योजना किती जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल?
उत्तर: ही योजना 100 निवडक जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.