Mohan bhagwat vande bharat express Sarkarnama
देश

Mohan Bhagwat : मोठी बातमी : मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवर 'यूपी'त दगडफेक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची काही तासांपूर्वीच घेतली होती भेट...

Mohan Bhagwat Vande Bharat Express stone pelting : आरएसएस प्रमुख मोहन भागवत प्रवास करत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर उत्तर प्रदेशात दगडफेकीची घटना घडली. काही तासांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

Rashmi Mane

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर उत्तर प्रदेशात दगडफेक झाल्याची मोठी घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी हरदोई जिल्ह्यात ही घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लखनौ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने मोहन भागवत मेरठकडे जात होते. दुपारी सुमारे 3:20 वाजण्याच्या सुमारास हरदोई जिल्ह्यातील कौधा गावाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी ट्रेनवर दगडफेक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दगडफेकीत ट्रेनच्या C4 कोचच्या खिडकीच्या काचेला तडा गेला. मात्र सुदैवाने मोहन भागवत यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. रेल्वे संरक्षण दलाकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मेरठ येथे विशेष पथक पाठवण्यात येणार असून, संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. दगडफेक कोणी आणि का केली, याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेच्या काही तासांपूर्वीच मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांची भेट घेतली होती. बुधवारी लखनौमधील निराला नगर परिसरातील सरस्वती शिशु मंदिर येथे ही महत्त्वाची बैठक पार पडली. जवळपास 30 मिनिटे दोघांमध्ये राज्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी काळातील काही महत्त्वाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती.

दगडफेकीच्या घटनेनंतरही मोहन भागवत सुरक्षितपणे मेरठ येथे पोहोचले. रात्री सुमारे 9 वाजता कडक पोलीस बंदोबस्तात त्यांनी मेरठ रेल्वे स्थानकावर उतरत माधव कुंज, शताब्दी नगर येथे मुक्काम केला. 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 2 दिवसांच्या संवाद कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते क्रीडापटू आणि विविध क्षेत्रातील बुद्धिजीवींशी संवाद साधणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT