Kolhapur Politics : कोल्हापुरात महायुतीत ठिणगी! दोन गटनेते आमनेसामने; 'त्या' वादामुळे दोन्ही पक्षांत असंतोषाचा भडका

Mahayuti leaders face off in Kolhapur: कोल्हापुरात महायुतीतील दोन गटनेते एका वादाच्या पार्श्वभूमीवर आमनेसामने आले असून या घटनेमुळे दोन्ही पक्षांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur political clash: शेवटचा दिवस तोंडावर आला तरी आजून कोल्हापूर महापालिकेतील समितीवरील सदस्यांची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे कोणाच्या नावाची वर्णी लागणार, याची उत्सुकता होती. त्या संदर्भात गुरुवारी महायुतीच्या गटनेत्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक एका कार्यालयात पार पडली.

तीन गटनेत्यांची बैठक सुरू असताना दोन गटनेत्यांमध्ये सुरू झालेली चर्चा हमरीतुमरीवर येऊन प्रकरण हातघाईपर्यंत गेले. एकमेकांचा एकेरी उल्लेख करीत बघून घेण्याची भाषाही वापरली गेली. त्यात जोरदार वादावादी झाली.त्यानंतर सदस्यांची निवड झाली.

तर महायुतीतील घटक पक्षांमध्येच

स्थायी सभापतिपद व स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराजी आहे. तर भाजपमध्ये असंतोषाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे अनेकांनी समित्यावर घेण्याचा शब्द दिल्यानंतर हा असंतोष कमी झाला. समितीवरील नावे निश्चित करून संबंधितांना आश्वस्त केल्यानंतरही अखेरच्या क्षणी बदलण्याचा प्रकार सुरु झाल्याने पुन्हा असंतोष पाहायला मिळाला. त्यामुळे समितींमध्ये कुणाची नावे घातली जातात, यातूनही त्यात भर पडण्याची शक्यता आहे.

Kolhapur Municipal Corporation
Kolhapur News : कोल्हापूर पालिकेत सत्तेसाठी महायुतीची रस्सीखेच; 'महिला राज' आणि 'परिवहन'च्या चाकावरून समीकरण सुटेना

स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे आहे. महापौरपदी महिला असल्याने सभापतिपदी महिलेला संधी द्यायचे ठरले आहे. काही नावांची चर्चा होती. त्याशिवाय नवीन कुणाला संधी मिळणार की, पुरुष नगरसेवकाला पदावर बसविले जाणार, याचीही शक्यता होती. पण, नाव निश्चित करण्यावेळी सोमवारी नेत्यांजवळ मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त करण्यात आला. त्यातील नाराजीवरून राजीनामा देण्यापर्यंत मजल गेल्याचे समजते.

Kolhapur Municipal Corporation
Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळांची फटकेबाजी; 'तिरकस' प्रश्नाने राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार?

सभापती पदाची निवड कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे नजरा लागणार आहेत. मात्र भाजपकडे हे पद असल्याने राजनंदा महाडिक किंवा विशाल शिराळे यांना स्थायी समिती सभापती पदावर बसवण्याच्या चर्चा सुरु आहेत. अखेर काल गुरुवारी त्यावर निर्णय झाल्यानंतर आज पुन्हा एकदा महायुती नेत्यांची बैठक झाली. अखेर सर्व नावावर एकमत झाले. आणि महापालिकेत समितीवरील सदस्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com