Parliament Assembly Monsoon Session 2026  Sarkarnama
देश

Monsoon Session 2026 : विरोधकांच्या गोंधळात सरकारचा मास्टरस्ट्रोक; पाच महत्वाची विधेयके मंजूर, अधिवेशनाचे सूप वाजले...

Parliament Monsoon Session 2026 decisions : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. कोणती विधेयके मंजूर झाली, कोणती अडकली आणि चर्चेत राहिलेले ५ मोठे निर्णय जाणून घ्या.

Rashmi Mane

संसदेते पावसाळी अधिवेशन आज १३ ऑगस्टला संपत आहे. हे अधिवेशन प्रचंड गाजले ते सभागृहातील विरोधकांच्या गदारोळ, विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न आणि सत्ताधाऱ्यांकडून विधेयके मंजूर करण्याचा वेग यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे कामकाज किती झाले आणि कोणते मोठे निर्णय घेण्यात आले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संसदडॉटइनच्या अहवालानुसार, या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने एकूण 19 विधेयके मंजूर करून घेतली. विशेष म्हणजे यातील 7 विधेयके अवघ्या 36 मिनिटांत मंजूर झाली. त्यामुळे विरोधकांचा सभागृहातील गदारोळ आणि विरोध तर सरकारचा विधेयक मंजूर करण्याचा वेग हा चर्चेचा विषय ठरला.

अँटी पेपर लीक विधेयक

सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनों की रोकथाम) संशोधन विधेयक, 2026 मंजूर करण्यात आले. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटीवर नियंत्रण आणणे हा या कायद्यातील बदलांचा प्रमुख उद्देश आहे.

टॅक्स आणि MSME संदर्भातील मोठे बदल

कराधान आणि अन्य विधी (संशोधन) विधेयकाद्वारे कराशी संबंधित विद्यमान तरतुदींमध्ये बदल करण्यात आले. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास (संशोधन) विधेयक, 2026 मंजूर झाले. यामुळे MSME क्षेत्रातील विलंबित पेमेंटच्या समस्येवर उपाययोजना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार

सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) संशोधन विधेयक, 2026 मंजूर झाले. या बदलानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 होणार आहे.

जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम कडक

जन्म आणि मृत्यू नोंदणी (संशोधन) विधेयक, 2026 देखील दोन्ही सभागृहांत मंजूर झाले. विलंबाने होणाऱ्या जन्म-मृत्यू नोंदणीसंदर्भातील नियम अधिक कडक करण्याचा यामागील उद्देश आहे.

कोणती विधेयके अजूनही प्रलंबित?

दुसरीकडे, आज शेवटचा दिवस असताना राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज ११ वाजता सुरू झाले. पण कामकाज सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाले. त्यामुळे परिसीमन विधेयक, महिला आरक्षणाशी संबंधित पुढील प्रक्रिया आणि Foreign Contribution (Regulation) Amendment Bill, 2026 यांसारख्या विषयांवर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच FCRA विधेयक संसदेत विचाराधीन असल्याची माहिती अधिकृत PIB Fact Sheet मध्ये देण्यात आली होती. त्यामुळे आता पुढे काय होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT