Mumbai News, 13 Aug : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिले आहे. नार्वेकर सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सीएसएमटीवरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्याची मागणी करणारे पत्र रेल्वेमंत्र्यांना सुपूर्द केले.
देशभर पोहोचावा महाराजांच्या कार्याचा संदेश
सीएसएमटी हे मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकावरून देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
त्यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्यास त्यांच्या शौर्य, स्वराज्य आणि कार्याचा संदेश महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल, अशी भूमिका नार्वेकर यांनी मांडली आहे.सीएसएमटी हे केवळ मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानक नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी जोडलेले ऐतिहासिक स्थळ आहे.
त्यामुळे या स्थानकातून सुटणाऱ्या आणि येथे येणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत या उद्घोषणा करण्याची मागणी नार्वेकर यांनी केली आहे. आता रेल्वे मंत्रालय या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.