Monsoon Updates 
देश

Monsoon Update: पावसाचं नेमकं काय सुरुए? १२५ वर्षातला विक्रम मोडीत निघणार; काय आहे स्थिती?

Monsoon Update: जून महिना आता संपला आहे, तरीही देशभरात अपेक्षित पाऊस झालेला नाही.

Amit Ujagare

Monsoon Update: जून महिना आता संपला आहे, तरीही देशभरात अपेक्षित पाऊस झालेला नाही. पावसाच्या सुरु होण्याच्या पहिल्याच महिन्यांत अशा पद्धतीनं अत्यंत कमी पाऊस पडणारी यंदाची घटना ही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. खरंतर हा कमी पावसाचा विक्रमच म्हणावा लागेल. कारण यापूर्वी १२५ वर्षांच्या इतिहासात असे जून महिन्यांत कमी पाऊस पडल्याची केवळ चारच वर्षे आहेत. त्यात आता यंदाच्या वर्षाची भर पडू शकते.

नेमकी स्थिती काय?

जून महिना संपायला आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. पण सरासरी ४३ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यातच हा महिना आजवरचा सर्वात बिनपावसाचा महिना ठरणार आहे. जून महिना हा पावसाळ्याचा पहिला महिना असतो, यामध्ये सुमारे १६५.३ मिमी पावसाचा अंदाज होता, पण आता इतका पाऊस न झाल्यानं हे देशासाठी सर्वाधिक लांबलेला पावसाचा महिना ठरला आहे. १९०१ पासून भारतात कमी पावसाची काही वर्षे गेली आहेत. या १२५ वर्षांच्या कार्यकाळात केवळ ४ वर्षेच अशी होती जिथं जून महिन्यात १०० मिमीपेक्षा कमी पाऊस पडला. १९०५, १९२६, २००९ आणि २०१४ ही ती वर्षे असून या वर्षी जून महिन्यांत १०० मिमीहून कमी पाऊस झालेला आहे. सर्वाधिक कमी पाऊस (८७.५ मिमी) हा २००९ मध्ये झाला होता.

दरम्यान, यंदा जून महिन्यांत केवळ ८५.२ मिमी सरासरी पाऊस नोंदवण्यात आला आहे. हवामान खात्यानं जून महिन्यात ९२ टक्के आणि सर्व चार महिन्यांत सरासरी ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या पावसाच्या चार महिन्यांवर अलनिनोचा प्रभाव असणार आहे. पण हा प्रभाव अद्याप उच्च पातळीवर पोहोचलेला नाही पण त्याचा प्रभाव सातत्यानं वाढत आहे. यापूर्वी जून महिन्यांत १०० मिमीहून कमी पाऊस पडलेल्या चार वर्षांवर (१९२६,२००९,२०१४) देखील एल निनोचा प्रभाव होता. पण १९२६ मध्ये मॉन्सूच्या पावसानं जूनच्या पावसाची कमतरता भरुन काढली होती. तर २००९ आणि २०१४ मध्ये पाऊस ९० टक्क्यांहून कमी होता.

एल निनोचा किती प्रभाव?

यंदाच्या जून महिन्यातल्या पावसावर एलनिनोचा प्रभाव खूपच कमी होता. कारण प्रशांत महासागरात तयार होणारा हा वाऱ्यांचा प्रभाव जगभरातील वातावरणावर आणि पावसावर प्रभाव टाकत असतो. हा अललिनोचा प्रभाव जूनच्या पहिल्या आठवड्यात समोर आला होता. पण भारतीय उपखंडावर याचा परिणाम काही काळानंतर दिसणार आहे. त्यामुळं जून महिन्यांत जो कमी पाऊस झाला त्यावर एलनिनोचा प्रभाव नव्हता, पण इतर काही स्थानिक वातावरणीय बदल ही कारणं देखील आहेत. जून महिन्यात मॉन्सूनचे वारे कमजोर होते. ४ जून रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यांतर ८ ते १५ जून पर्यंत याचा वेग कमी झाला होता. पण १८ जूननंतर या वाऱ्यांनी वेग धारण केला. याशिवाय विषुववृत्तावर पाऊस घेऊन येणारे ढग हे मॉन्सूनचे ढग येण्यास सहकार्य करत नव्हते. विषुववृत्तावर वाहणारे कोरडे उत्तरी वारे या भागावर प्रभावी राहिले, तसंच कमजोर मॉन्सून वाऱ्यांना पुढे नेण्यापासून त्यांनी रोखलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT