Jay Pawar News : अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवारांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, 'पार्थदादा, वहिनीसाहेब, सीएमसाहेबांमध्ये चर्चा...'

Finance Department NCP Sunetra Pawar : जय पवार ​ म्हणाले, "सर्व बोलतात की आपलं अर्थखातं अजून आपल्याकडे नाही आलं आहे, म्हणून काही काही ठिकाणी आपली विकासकामं थांबली आहेत. तसं नाहीये.
Jay Pawar
Jay PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिकामे झालेले 'अर्थ खाते' सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सांभाळत आहेत. मात्र, हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा कधी मिळणार, यावरून महायुतीमध्ये पडद्यामागे जोरदार चर्चा आणि रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य आहे.

अजित पवारांच्या निधनाला पाच महिने उलटून गेले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनीच मांडला होता. मात्र, आता आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, हे खाते आपल्याकडेच राहावे यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. मात्र या अधिवेशनानंतर हे पद राष्ट्रवादीकडे जाईल असे देखील बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर बारामतीत जय पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केला आहे.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासातील आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा कृतज्ञता स्नेह मिळाव्यात जय पवार बोलत होते.

Jay Pawar
Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर 3.0 : ठाकरेंच्या आमदाराची पोस्ट व्हायरल, विदर्भातील तीन आमदार शिंदेच्या गळाला?

जय पवार ​ म्हणाले, "सर्व बोलतात की आपलं अर्थखातं अजून आपल्याकडे नाही आलं आहे, म्हणून काही काही ठिकाणी आपली विकासकामं थांबली आहेत. तसं नाहीये. त्यावेळेस काय झालं, दादा आपल्याला सोडून गेले, अर्थसंकल्प तिथे जवळ होता. त्याच्यामुळे सीएमसाहेबांनी ठरवलं की त्या क्षणाला ते अर्थखातं त्यांच्याजवळ ठेवतील.

​आता काही दिवसांपूर्वी पार्थदादांची, वहिनीसाहेबांची आणि आमची तशी चर्चा झाली. सीएम साहेब बोलले की, लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे तसं येईल आणि तसेच भविष्यातले जे दादांचे विकासकामांचे स्वप्न होते, ते आपण पूर्ण करूया." जय पवार यावेळी म्हणाले.

अर्थ' ऐवजी 'महसूल' खात्याचा फॉर्म्युला?

राजकीय वर्तुळातील सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अर्थ खाते स्वतःकडेच कायम ठेवण्यास उत्सुक आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थ खात्यावरील आपला दावा सोडला, तर महायुतीत खालीलप्रमाणे अदलाबदलीचा नवीन फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच अर्थ खाते कायम राखले जाईल. आणि ​राष्ट्रवादीला 'महसूल खाते' मिळण्याची शक्यता: भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असलेले 'महसूल खाते' राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाऊ शकते. असं देखील बोललो जात आहे.

Jay Pawar
Education Policy : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता शालेय पुस्तकातून शिकता येणार वऱ्हाडी अन् मालवणी; 6 वीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com