Nasrapur Verdict: भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यामागचं मेरिट काय होतं? पूर्वीच्या 12 घटनांच्या संदर्भही ठरले महत्वाचे

Pune Nasrapur Case Result: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला फाशी देण्यामागं अनेक गोष्टी महत्वाच्या ठरल्या आहेत. कोर्टानं निकालाचं वाचन करताना या गोष्टी नोंदवल्या.
Nasarpur verdict Bhimrao Kamble death sentence details
Nasarpur verdict Bhimrao Kamble death sentence detailsSarkarnama
Published on
Updated on

Nasarpur Case Update: नसरापूर प्रकरणातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला विशेष सत्र न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

घटना घडल्यानंतर केवळ ५५ दिवसांत सर्व पुरावे कोर्टासमोर मांडून त्यावर सविस्तर सुनावणी होऊन शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना आहे. पण या फाशीच्या शिक्षेमागे नेमकं काय मेरिट कारणीभूत ठरलं? तसंच यापूर्वीच्या १२ घटनांचे कुठले संदर्भ यासाठी महत्वाचे ठरले हे जाणून घेऊयात.

Nasarpur verdict Bhimrao Kamble death sentence details
Eknath Shinde Politics : रवींद्र चव्हाण, कपिल पाटलांच्या विरोधात एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी; बविआ, कथोरें भक्कम साथ!

फाशीच्या शिक्षेमागचं मेरिट काय होतं?

नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला फाशी देण्यामागं अनेक गोष्टी महत्वाच्या ठरल्या आहेत. कोर्टानं निकालाचं वाचन करताना या गोष्टी नोंदवल्या.

1. यामध्ये यापूर्वी आरोपीनं जी कृत्ये केली आहेत त्याप्रकरणी त्याला अटक झाली होती, त्याच्या गुन्हे दाखल आहेत. पण त्याला या प्रकरणांमध्ये कधीच शिक्षा लागली नाही तो निर्दोष सुटला होता. त्यामुळंच त्याला या गुन्ह्याची भीती नव्हती यावेळीही आपण बाहेर येऊ असं त्याला वाटतं होतं. त्यामुळं कोर्टाला देखील त्याचा हा विश्वास खोडून काढायचा होता.

2. त्याचबरोबर जेव्हा कोर्टासमोर उभं केलं तेव्हा त्यानं जे काही कृत्य केलं ते तो सहजरित्या सांगत होता, त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची कसलंही चित्र नव्हतं. शेवटी कोर्टालाच त्याला हे वर्णन करण्यापासून थांबवण्याची वेळ आली.

3. ही केस परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होती. या पुराव्यांमध्ये एकही लिंक मिसिंग असेल तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो, पण हे पोलिसांनी अशी कुठलीही लिंक तुटू न देता हे सर्व पुरावे व्यवस्थितपणे कोर्टासमोर मांडले.

4. आरोपीचं वय गुन्हा करतेवेळी ६५ वर्षे होतं, पण सरकारी पक्षाच्या सांगण्यानुसार तो काहीसा मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. पण तरीही आरोपीनं अत्याचार केल्यानंतर पीडित चिमुकलीला दगडानं ठेचून मारल्याचं तसंच तिचा मृतदेह शेणामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला.

Nasarpur verdict Bhimrao Kamble death sentence details
Medha Kulkarni: वटपौर्णिमेसाठी सरकारी आदेश बदलला.. कडेकोट पोलीस बंदोबस्तात खासदार मेधा कुलकर्णींकडून फुलेवाड्यात वडपूजन

5.आरोपी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याला या प्रकरणात ७ विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्व कलमांतर्गत तो दोषी ठरला आहे.

6. त्याचबरोबर यापूर्वीही त्याच्याकडून महिला अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत, पण त्यात तो निर्दोष सुटला असला तरी आत्ताची घटना ही त्यानं अत्यंत क्रूर पद्धीतनं केली आह. त्यामुळं त्याला फाशीची शिक्षाही पुरेशी नाही, असं स्पष्ट मत कोर्टात न्यायाधिशांनी व्यक्त केलं.

खटल्याचा घटनाक्रम काय?

६५ वर्षाच्या ओरोपीनं ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले, हे पूर्वनियोजित कट होता. आरोपी काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला. ती चिमुकली तिच्या आजीसोबत राहते हे आरोपीनं पडताळून बघितलं, आरोपीनं जागेची रेकी केली. त्यानं घटनास्थळ निश्चित केलं तिथं त्याचं सामान तिथं नेलं, आरोपी काही दिवस तिथं वास्तव्याला गेला त्यानंतर त्यानं लहान मुलीला खाऊचं आमिष दाखवून गाईचं वासरु दाखवतो असं सांगून घटनास्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले, अशा सब्दांत विशेष सरकारी वकील संपूर्ण घटनाक्रम दाखवला.

Nasarpur verdict Bhimrao Kamble death sentence details
TVK Government : तमिळनाडूत लवकरच मोठी राजकीय उलथापालथ; थलापती विजय यांचे सरकार कोसळणार? स्टॅलिन यांचा खळबळजनक दावा

बारा कायदेशीर प्रकरणांचा दाखला

कोर्टानं याप्रकरणात १२ केस लॉजचं सार वाचून सांगितलं. या १२ केसेसमधील जी तथ्ये आहेत ती या केसमध्ये कशी लागू होतात, याबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे. यावर कोर्टानं सविस्तर भाष्य केलेलं आहे. या आरोपीला एकूण ३ गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावला आहे. यामध्ये १२०० पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं, यामध्ये लास्ट सीन टुगेदरची थेअरी, वैज्ञानिक पुरावे, मेडिकल पुरावे आणि डीएनए प्रोफाईलिंग हे महत्वाचे मुद्दे होते, त्या आधारे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. यानंतर २८ मेला आरोपीविरोधात दोषनिश्चिती करण्यात आली. त्यानंतर २९ मेपासून या खटल्याला सुरुवात झाली यात १६ दिवसांत ५५ साक्षीदार तपासण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com