TMC Vs BJP : ममता तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरावर शनिवारी पहाटे हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला.
गेल्या सहा महिन्यांत झालेला हा सातवा जीवघेणा हल्ला असल्याचा दावाही बॅनर्जी यांनी केला. डायमंड हार्बर मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या बॅनर्जी यांनी हा हल्ला आपल्याला जिवे मारण्याच्या कटाचा भाग असल्याचा आरोप केला.
हल्ल्यापूर्वी सलग दोन दिवस आपल्या कार्यालयावर आणि घरावर पाळत ठेवण्यात येत होती, असेही त्यांनी म्हटले. या संघर्षात अनेक समर्थक गंभीर जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला.
अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध केला आहे. ‘‘भाजपकडे किती बुलडोझर आहेत? त्यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी ते माझ्या अंगावर चालवून दाखवावेत, ’’ असे आव्हान त्यांनी केले आहे.
तसेच, या हल्ल्याच्या निषेधार्थ धरण्यावर बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कालीघाट येथील कालीपूजेच्या परंपरेमध्येही बाधा आणण्यात येत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.