

Dehradun News : उत्तराखंडमधील भाजपच्या नेत्या व महिला आणि बालकल्याण खात्याच्या कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू उर्फ पप्पू गिरधारी यांच्या विरोधात 20 दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीच्या तक्रारीवरून गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर ते गेल्या 20 दिवसापासून फरार होते. डेहराडून पोलिसांनी गिरधारी लाल साहू यांना उत्तर प्रदेशातील झाशी येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तराखंड सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री रेखा आर्य यांनी 15 ऑक्टोबर 2026 रोजी डेहराडूनमधील कॅन्ट पोलीस ठाण्यात पती गिरधारी लाल साहू यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यांनी पतीवर छळ, फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि जीवे मारण्याचा कट रचल्यासारखे गंभीर आरोप केले होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी एसआयटीचीही (SIT) स्थापना करण्यात आली होती.
पप्पू गिरधारी हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसानी जोरदार शोध मोहीम राबवली होती. संशय असलेल्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील संभाव्य ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले होते. दरम्यान, अटकेपासून बचाव करण्यासाठी गिरधारी लाल साहू यांनी कोर्टात जमीन मिळवण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांना कोर्टाने दिलासा दिला नव्हता.
गिरधारी लाल साहू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला फेटाळल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची आणि अटकेला स्थगिती देण्याची मागणी करणारी त्यांची याचिकाही फेटाळली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपस करीत डेहराडून पोलिसांनी (Police) गिरधारी लाल साहू यांना उत्तर प्रदेशातील झाशी येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या .
पतीने केले रेखा आर्य यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप
या प्रकरणात अटक करण्यात आलेले गिरधारी लाल साहू यांनी त्यांच्या पत्नी रेखा आर्य यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. पप्पू गिरधारी यांना झाशीमधून अटक करण्यात आल्यानंतर पोलीस तपासात आणखी कोणते मुद्दे समोर येणार याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.