B. S. Yediyurappa-Vijayendra-Siddaramaiah sarkarnama
देश

Siddaramaiah News : काँग्रेसच्या सिद्धरामय्यांविरुध्द लढण्यास येडियुरप्पांच्या मुलाचा नकार; खासदार प्रतापसिंहांसाठी आरएसएस आग्रही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थानिक नेतृत्वाच्या सूचनेवरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या (Siddaramaiah) यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांना वरुणा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. (MP Pratap Singh will contest the election against Siddaramaiah)

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थानिक नेतृत्वाच्या सूचनेवरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहेत. खासदार प्रताप सिंह यांना पक्षाचा युवा चेहरा समजले जाते. ते पक्षाच्या बाजूने मते बदलू शकतात, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते.

म्हैसूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रताप सिंह हे काँग्रेस नेते सिध्दरामय्या यांचे कट्टर विरोधक मानले जातात. विधानसभेच्या निवडणुकीत दोघेही एकमेकाविरुध्द लढले, तर ही चुरशीची लढत होईल, अशी चर्चा सध्या वरुणामध्ये सुरू आहे.

येडियुरप्पांच्या मुलाची माघार

दरम्यान, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपले पुत्र बी. वाय. विजयेंद्र हे वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे संकेत दिले होते. मात्र, विजयेंद्र यांनीच सिद्धरामय्या यांच्या विरोधात लढण्यास नकार दिल्याने येडियुरप्पांनीही ‘यू टर्न’ घेत विजयेंद्र वरुणामधून लढणार नसल्याचे स्पष्ट केले हेाते.

हायकमांडने माझा मुलगा विजयेंद्र यांना वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे मान्य केले होते. पण, मी स्वतःच म्हणालो की, मला वरुणामध्ये स्पर्धा नको आहे. याबाबत मी हायकमांडचे मन वळवणार आहे. कोणत्याही कारणास्तव विजयेंद्र वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्ते खूप दबाव टाकत आहेत. मात्र, तो शिकारीपुरा सोडणार नाही. मला शिकारीपुरातून थांबायचे आहे. त्यामुळे विजयेंद्र माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल, असेही येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT