Prime Minister Narendra Modi announces increased MSP for 14 Kharif crops, aiming to bolster farmer income and agricultural growth.  Sarkarnama
देश

MSP Hike : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट; 14 पिकांच्या हमीभावात वाढ, कापूस, सोयाबीन, ज्वारीचा भाव किती?

Government Approves MSP Hike for 14 Kharif Crops : केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजेच हमीभाव जाहीर केले.

Rajanand More

Key Crops Benefiting from the MSP Increase : देशात यंदा मॉन्सून लवकर दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यातच आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचाही समावेश आहे.

सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ४३६ रुपयांची कापसाच्या हमीभावात ५८९ रुपयांची वाढ केली आहे. या वाढीमुळे २०२५-२६ च्या खरीप हंगामात सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ११० रुपये हमीभाव मिळणार आहे. कापसाप्रमाणेच तुरीचा हमीभावही ८ हजार रुपयांपर्यंत वाढविला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजेच हमीभाव जाहीर केले. कापूस, सोयाबीन, तुरीप्रमाणेच मका, ज्वारी, बाजरी, उडीद, भूईमुग, मूग, सूर्यफूल तीळ आदी पिकांचे हमीभावही जाहीर केले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली.

वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीभाव निश्चित करताना कृषी किंमत व मूल्य आयोगाच्या शिफारशींचा विचार करण्यात आला आहे. उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्यात आला आहे. आयोगाकडून मागणी आणि पुरवठा, जागतिक बाजारभाव, जागतिक बाजारातील घडामोडी आदी बाबींचा विचार करून शिफारशी केल्या जातात.

केंद्र सरकारने मक्याच्या हमीभावातही १७५ रुपयांची तर ज्वारीच्या हमीबावात ३२८ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या पिकांचा हमीभाव अनुक्रमे २४०० रुपये, हायब्रीड ज्वारीचा ३ हजार ६९९ रुपये तर मालदांडी ज्वारीचा ३ हजार ७४९ रुपये हमीभाव असेल. सर्वाधिक ८२० रुपयांची वाढ कारळे पिकाच्या हमीभावात करण्यात आली आहे.

खरीप पिकांचे २०२५-२६ साठीचे हमीभाव (कंसात वाढलेला भाव)

कापूस मध्यम धागा – ७७१० (५८९)

कापूस लांब धागा - ८११० (५८९)

सोयाबीन - ५३२८ (४३६)

तूर – ८००० (४५०)

मका - २४०० (१७५)

ज्वारी हायब्रीड – ३६९९ (३२८)

ज्वारी मालदांडी - ३७४९ (३२८)

भात सामान्य – २३६९ (६९)

भात ए ग्रेड - २३८९ (६७)

बाजरी – २७७५ (१५०)

रागी – ४८८६ (५९६)

मूग - ८७६८ (८६)

उडीद – ७८०० (४००)

भूईमूग - ७२६३ (४८०)

सूर्यफूल – ७७२१ (४४१)

तीळ - ९८४६ (५७९)

कारळे – ९५३७ (८२०)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT