Manipur CM Steps Down
Manipur CM Steps DownSarkarnama

Manipur Government : मणिपूरमध्ये पुन्हा राजकीय भूकंप; सत्तास्थापनेसाठी 44 आमदारांच्या हालचाली, नेते राज्यपालांना भेटले...

BJP Asserts Majority Support in Manipur Assembly : भाजपचे नेते राधेश्याम सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर हा दावा केला आहे.
Published on

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपने राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नव्या सरकारसाठी 44 आमदारांनी तयारी सुरू केली असून बुधवारी त्यापैकी काही आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सरकार स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भाजपचे नेते राधेश्याम सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, लोकांच्या इच्छेनुसार नवे सरकार स्थापन करण्यासाठी 44 आमदार तयार आहेत. राज्यपालांना याबाबत माहिती दिली आहे. याबाबत कोणते पर्याय आहेत, याबाबत राज्यापालांशी चर्चा केली.

भाजपचे केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप याबाबत ग्रीन सिग्नल आहे की नाही, याबाबत राधेश्याम यांनी सूचक विधान केले. सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही, याबाबत विचारले असता त्यांनी भाजपचे केंद्रीय नेतृत्व याबाबत निर्णय़ घेईल, असे उत्तर दिले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी 44 आमदारांसोबत वैयक्तिक आणि एकत्रितपणेही चर्चा केल्याचेही सिंह यांनी सांगितले.

Manipur CM Steps Down
Vaishnavi Hagawane Case : वडिलांना मुलगी जड झाली होती काय? समाज, प्रतिष्ठेपायी नको ते घडलं...

लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील कार्यकाळात कोविडमध्ये दोन वर्षे वाया गेली होती. तर या कार्यकाळात राज्यातील अंतर्गत संघर्षामुळे आणखी दोन वर्षे वाया गेली. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी विरोध करणारे कुणीच नाही, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मणिपूरमध्ये फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू आहे.

मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समाजामध्ये जातीय संघर्ष सुरू आहे. तेव्हापासून तत्कालीन भाजप सरकारवर जोरदार टीका होत होती. संघर्ष मिटवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. तत्कालीन मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. त्यानंतर सिंह यांनी 9 फेब्रुवारीला पदाचा राजीनामा दिला होता.

Manipur CM Steps Down
लालूंनी नातवाला दिले ‘या’ देवाचे नाव; कधी ऐकला नसेल हा शब्द...

राज्यात 60 सदस्यीय विधानसभेत सध्या 59 आमदार आहे. एका आमदाराचा मृत्यू झाल्याने एक जागा रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत मैतेई समाजाचे 32, तीन मणिपुरी मुस्लिम आणि नऊ नागा समाजाचे आमदार असे एकून 44 आमदार आहेत. या सर्व आमदारांची सत्तास्थापनेसाठी पुन्हा तयारी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com