New Delhi News : भारताला अमेरिकेतील कोर्टात मोठे यश मिळाले आहे. मुंबईवर 16 वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता राणाला ताब्यात घेण्यासाठी भारताकडून वेगात प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याआधी राणाने मास्टरमाईंड डेव्हिड कोलमन हेडली याची रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. हेडलीने मुंबईतील अनेक ठिकाणांची रेकी केली होती. राणाला शिकोगामध्ये एफबीआयने 2009 मध्ये अटक केली होती. राणा पाकिस्तानातील आयएसआय आणि लष्कर एक तोयबाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
राणाला अटक केल्यानंतर भारताकडून त्याच्या मुंबई हल्ल्यातील सहभागाबाबत अमेरिकेतील कोर्टात पुरावे सादर करण्यात आले होते. हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग दिसत असल्याचे पुराव्यांमधून स्पष्ट होत होते. त्यामुळे कोर्टाने काही महिन्यांपूर्वीच प्रत्यर्पणाबाबत सकारात्मक मत व्यक्त केले होते. अमेरिकेतील कोर्टातील खटले आणि भारतातील आरोप वेगळे असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले होते.
तहव्वुर राणा हा मुळचा पाकिस्तानातील आहे. त्याने पाकिस्तानी लष्करात दहा वर्षे डॉक्टर म्हणून सेवा केली आहे. नोकरी सोडल्यानंतर तो भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय झाला होता. तो सध्या कॅनेडियन नागरिक आहे. शिकोगामध्ये स्थायिक झाला होता. तिथेच व्यवसाय सुरू केला होता. राणाला जवळपास सात भाषा बोलता येतात.
राणाने 2006 ते नोव्हेंबर 2008 पर्यंत पाकिस्तानात हेडली आणि इतर लोकांसोबत हल्ल्याचे षडयंत्र रचले होते. या काळात त्याने लष्कर ए तोयबा आणि हरकत उल जिहाद ए इस्लामी या दहशतवादी संघटनांची मदत केली तसेच हल्ल्याचे प्लॅनिंग केल्याचा आरोपही राणावर आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरून गेले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.