
Manipur News : मणिपूरमध्ये गेल्या दीड वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. केंद्र आणि मणिपूर (Manipur) सरकारला राज्यात सुरू असलेला हिंसाचार आटोक्यात आणण्यात सपशेल अपयश आले. आता या हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मोठं विधान केलं आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री (Chief Minister) एन बिरेन सिंह यांनी मंगळवारी (ता.31) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सिंह यांनी मणिपूरच्या हिंसाचारावर भाष्य केलं आहे. तसेच मणिपूरच्या जनतेची जाहीर माफी मागतानाच नव्या वर्षात राज्यातील शांतता पूर्ववत होईल अशी आशा जागवली आहे.
मुख्यमंत्री सिंह म्हणाले,संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले. 3 मे 2023 पासून आजपर्यंत राज्यात जे काही घडले, त्याबद्दल मणिपूरच्या जनतेची माफी मागायची आहे. अनेकांनी आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना गमावलं, तसेच अनेक लोक बेघही झाले, याबद्दल आपण खूप दु:खी आहोत. मला खरंच माफ करा असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं.
पण याचवेळी त्यांनी गेल्या 3-4 महिन्यांपासून राज्यात शांतता आहे. नव्या वर्षात राज्यात सामान्य स्थिती आणि शांतता पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच भूतकाळातील चुका विसरून नव्या आयुष्याला सुरुवात करावी लागणार आहे. शांततापूर्ण आणि समृद्ध मणिपूरसाठी आपल्या सर्वांना एकत्र राहायला हवं असं आवाहनही मुख्यमंत्री सिंह यांनी यावेळी मणिपूरच्या जनतेला केलं आहे.
केंद्र सरकारकडून राज्यातील बेघर कुटुंबियांना सर्वतोपरी मदतकार्य सुरु केलं आहे. यात सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसा पैसा उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी सिंह यांनी यावेळी दिली आहे.तसेच विस्थापितांनाही नवीन घरे बांधून दिली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
केंद्र सरकारकडून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्यापासून संवेदनशील जिल्ह्यांच्या सीमेवर सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. यामुळे गोळीबाराच्या घटना रोखण्यात काहीसं यश आलं. याचवेळी त्यांनी आतापर्यंत सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याचेही म्हटलं.
तसेच त्यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी तब्बल 12 हजार 247 गुन्हे नोंदवण्यात आले असून 600 हून अधिक आरोपींना अटकही करण्यात आल्याची माहिती दिली आहे. याचदरम्यान,सुमारे 5 हजार 600 शस्त्रे आणि स्फोटकांसह दारूगोळा जप्त केल्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी यावेळी सांगितलं.
ईशान्येकडील मणिपूर या राज्यात गेल्यावर्षी म्हणजे 2023 च्या मे महिन्यात हिंसाचार, जाळपोळ सुरू झाली. त्यानंतर काही महिन्यांनी एका समुदायातील लोकांनी अन्य समुदायाच्या एका महिलेची भरदिवसा नग्नावस्थेच धिंड काढल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.
मणिपूरमध्ये मैतेई समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा दिला जाणार, यासंबंधीच्या बातम्या समोर आल्यानंतर तिथे हिंसाचार भडकला होता. सरत्या वर्षातही मणिपूरमध्ये हिंसाराचा हा वणवा धुसमतच राहिला. केंद्र आणि राज्य सरकारला हिंसाचार आटोक्यात आणण्यात सपशेल अपयश आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.