Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रतेवर शनिवारी पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांबरोबरच आता खासदारांचीही चौकशी सुरू झाली आहे. आमदार आणि खासदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ही सुनावणी सुरू आहे. यावेळी शनिवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचीही साक्ष नोंदवण्यात येत आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदविण्यात आली. या सुनावणीवेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, शिवसेनेच्या(Shivsena) कार्यकारिणीचा ठराव झाल्याचं मला माहीत नाही. वकिलांनी दाखविलेला ठराव पहिल्यांदाच पाहत आहे, असे म्हणत शिवसेनेचा कार्यकारिणी ठरावच फेटाळून लावला आहे. त्यांच्या या साक्षीने उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला आव्हान दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आमदार अपात्रतेच्या सुनावणीत पहिल्यांदाच खासदाराचीही उलटतपासणी होत आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे Rahul Shewale यांची उलटतपासणी करण्यात आली.
ठाकरे गटाचे वकील अनिल साखरे हे राहुल शेवाळे यांची उलट तपासणी घेत आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरें Uddhav Thackeray च्या नियुक्तीला आव्हान देणारी साक्ष दिल्याने खळबळ झाली. शेवाळे यांनी शिवसेनेचा कार्यकारिणी ठरावच फेटाळून लावला आहे. ठरावाबाबत कोणतीच बैठक झाली नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकारिणीचा ठराव झाल्याचं मला माहीत नाही. वकिलांनी दाखविलेला ठराव पहिल्यांदाच पाहत असल्याची साक्ष राहुल शेवाळे यांनी दिली आहे. शेवाळे यांच्या या साक्षीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीलाच आव्हान मिळाले का? अशी चर्चा आहे.
Edited By : Amol Sutar
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.