Rahul Shewale Defamation Case: राहुल शेवाळे मानहानी प्रकरण; ठाकरे, राऊतांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर 'या' दिवशी फैसला

Uddhav Thackeray and Sanjay Raut: राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज दाखल केला होता...
Uddhav Thackeray and Sanjay Raut, Rahul Shewale
Uddhav Thackeray and Sanjay Raut, Rahul Shewale Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. यानंतर शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यामुळे ठाकरे आणि राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच ठाकरे आणि खासदार राऊतांना या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला.

यानंतर या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज दाखल केला होता, तसेच राहुल शेवाळे यांनी दाखल केलेला मानहानीचा दावा रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती. आता या दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. 26 ऑक्टोबरला माझगाव न्यायालय या याचिकेवर निकाल देणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray and Sanjay Raut, Rahul Shewale
Rahul Shevale Defamation Case: ठाकरे, राऊतांची डोकेदुखी वाढणार ? खासदार शेवाळेंच्या मानहानी प्रकरणी न्यायालयाने दिले 'हे' मोठे निर्देश

दरम्यान, या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज मेंटेनेबल नाही, असा दावा राहुल शेवाळे यांच्या वकिलांने केला. तसेच राहुल शेवाळे हे शिवसेनेत 30 वर्षे होते, त्यामुळे आता त्यांना टार्गेट केले जात आहे, असाही दावा शेवाळे यांच्या वकिलांकडून करण्यात आला. तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी शेवाळे यांच्या वकिलाने केलेला दावा खोडून काढला.

नेमकं प्रकरण काय ?

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकामध्ये एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची तक्रार न्यायालयात खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती.

29 डिसेंबर 2022 ला हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता, असा दावा शेवाळेंकडून करण्यात आलेला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर आता 26 ऑक्टोंबरला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Uddhav Thackeray and Sanjay Raut, Rahul Shewale
Rahul Shewale Defamation Case: उद्धव ठाकरे - संजय राऊतांना दिलासा; राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी जामीन मंजूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com