Myanmar Earthquake Sarkarnama
देश

Myanmar Earthquake : गृहयुद्धात अडकलेल्या म्यानमारवर निसर्गाची अवकृपा! विनाशकारी भूकंपात 700 जणांचा बळी, उंच इमारती कोसळल्याचे भयंकर VIDEO व्हायरल

India Sends Aid to Myanmar : भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार (Myanmar) तसंच थायलंड या दोन देशांमध्ये शुक्रवारी विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत सातशे हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन हजारांहून अधिक लोक जखमी आहेत. या भूकंपामुळे जवळपास 30 लाख लोक विस्थापित झाले आहेत.

Jagdish Patil

Myanmar Earthquake : भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार (Myanmar) तसंच थायलंड या दोन देशांमध्ये शुक्रवारी विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत सातशे हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन हजारांहून अधिक लोक जखमी आहेत. या भूकंपामुळे जवळपास 30 लाख लोक विस्थापित झाले आहेत.

म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाचे (Thailand Earthquake) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहेत. तसंच अनेक रस्ते, पूलही काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.

म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपाची (Earthquake) तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की म्यानमारच्या शेजारील राष्ट्रांमध्येही धक्के जाणवले. बांगलादेश, लाओस, चीनसह भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, म्यानमारमध्ये भूकंप झाला तो 10 किलोमीटर खोलीवर जाणवला, ज्यामुळे आफ्टरशॉकची शक्यता वर्तवली जात आहे. तर भूकंपानंतर म्यानमारमधील लष्करशाहीने भूकंपानंतर सहा प्रांतांत आणीबाणीची घोषणा केली आहे. मात्र, या भूकंपामुळे झालेले मृत्यू, जखमी आणि नुकसानीचा पूर्ण अंदाज अद्याप लावण्यात आलेला नाही.

या देशात सध्या गृह युद्धात भडका उडाला असतानाच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तात्काळ म्यानमारसाठी मदतीचा हात सरसावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

अडचणीच्या प्रसंगी भारत या दोन्ही देशांच्या बरोबर उभा आहे. दोन्ही देशांना लागेल ती मदत करण्यास भारत तयार असल्याचं त्यांनी म्हटलं. यानंतर तात्काळ भारताकडून 15 टन मदत सामग्री मदत म्हणून पाठवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे विमान हिंडन एअरफोर्स स्टेशनवरून मदत सामग्री घेऊन म्यानमारला रवाना झाले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT