Rajnikant, Sharukh Khan Sarkarnama
देश

Narendra Modi oath taking ceremony: Modi 3.0 शपथविधीला देश-विदेशातील दिग्गज मंडळीसह दिग्गज सेलिब्रिटीनी लावली हजेरी

Narendra Modi oath taking ceremony : या शपथविधी सोहळयास देश-विदेशातील दिग्गज मंडळीनी हजेरी लावली. या सोहळ्याला बॉलिवडूची मंडळीदेखील उपस्थित होते.

Sachin Waghmare

Modi cabinet 2024 : नरेंद्र मोदी (Modi 3.0 Cabinet) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पीएम नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळयास देश-विदेशातील दिग्गज मंडळीनी हजेरी लावली. या सोहळ्याला बॉलिवडूची मंडळीदेखील उपस्थित होते.

पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा रंगला होता. या सोहळ्यात जवळपास सात ते आठ हजार जणांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी मालदीवचे राष्ट्रपती, बांग्लादेशच्या शेख हसीनांसह विदेशी पाहुणे व बॉलिवूडमधील अभिनेते शाहरुख अन् रजनीकांतही दिसले.

या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूडसह अनेक दिग्गज सेलिब्रिटीनी राजधानी दिल्लीत हजेरी लावली. भुतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांचेही मोदींच्या शपधविधी सोहळ्याला उपस्थित होते. मालदिवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुईसुका,भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास यांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.

त्यासोबतच यावेळी बांग्लादेशच्या राष्ट्रपती शेख हसीना या सोहळ्याला उपस्थित होत्या. श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम रानिल विक्रमसिंघे हेही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यासोबाबतच बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, अक्षय कुमार, अभिनेत्री रविना टंडन, अक्षय कुमार आणि उद्योगपती मुकेश अंबानी हे शपथविधी सोहळ्याला हजर होते.

यावेळी तब्बल 71 जणांनी शपथ घेतली त्यामध्ये 30 जणांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद, सहा जण स्वतंत्र कारभार तर 36 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी राज्यातील नितिन गडकरी (Nitin Gadkari), पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर स्वतंत्र पदभार म्हणून शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव यांनी शपथ घेतली. तर केंद्रीय राज्यमंत्री पदाची रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले यांनी शपथ घेतली.

SCROLL FOR NEXT