Narendra Modi Oath Ceremony LIVE : राष्ट्रवादीनेच धुडकावली मंत्रिपदाची ऑफर; फडणवीसांची मनधरणी निष्फळ

Oath Ceremony NCP Praful Patel Devendra Fadnavis : मोदी सरकारचा रविवारी शपथविधी होत असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Modi Cabinet 2024 : राष्ट्रपती भवनात होत असलेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीनेच मंत्रिपदाची ऑफर धुडकावल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत जवळपास पाच डझन खासदारांचाही शपथविधी होणार आहे. महाराष्ट्रात पाच खासदार शपथ घेणार आहेत. मात्र, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुणाचाही समावेश नसल्याने चर्चांना उधाण आले होते.

याबाबत फडणवीसांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँगेसला राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पदाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी मंत्रिपदासाठी प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित केले होते. ते आधीही मंत्री असल्याने त्यांना राज्यमंत्रिपद नको होते. त्यामुळे राष्ट्रवादीने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुन्हा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी द्यावी, असे सांगितले आणि राज्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Narendra Modi Oath Ceremony Live Update : मोदींच्या टीममध्ये ‘हे’ असतील मंत्री; वाचा पक्षनिहाय संपूर्ण यादी

दरम्यान, मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी पटेल किंवा सुनिल तटकरे या दोघांनाही फोन न आल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच फडणवीस सकाळी तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी अजित पवार व इतर नेतेही उपस्थित होते.

जवळपास दीड तासांनंतर फडणवीस तिथून बाहेर पडले. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर फडणवीसांनी काही तासांनी याबाबत उलगडा केला. त्यानुसार पटेल किंवा तटकरे आज रविवारी शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com