Rahul Gandhi | One Rank One Pension | Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi | One Rank One Pension | Bharat Jodo Yatra  Sarkarnama
देश

Narendra Modi : 'वन रँक वन पेन्शन' वरून काँग्रेस भाजपमध्ये जोरदार जुंपली!

Chetan Zadpe

Narendra Modi : 'वन रँक वन पेन्शन' या निवृत्त अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या योजनेवरून, काँग्रेस - भाजपमध्ये आता संघर्ष होताना दिसून येत आहे. या योजनेत सुधारणा घडवून आणण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याचा फायदा तब्बल २५ लाख निवृत्त सैनिकांना होणार आहे. मात्र, ‘भारत जोडो’ यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधीची (Rahul Gandhi) काही निवृत्त सैनिकांनी भेट घेतल्यानंतर, दबाव आल्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला, असा दावा काँग्रेसने केला. या दाव्यावर आता भाजकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या या दाव्यानंतर आता भाजपने म्हंचले की, राहुल गांधींची ही यात्रा ‘भारत जोडो’ असे नसून, ‘क्रेडीट लेलो’ यात्रा आहे, काँग्रेस वरिष्ठ नेते, जयराम रमेश यांनी ट्वीट म्हंटले होते की, 'वन रँक वन पेन्शन' योजनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय, हा भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, “मोदी सरकारने या योजनेचत सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्च २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात चार वेळ वाढवून मागितली.

मात्र, राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेत २१ डिसेंबरला हरियाणाच्या फिरोजपूर-जिक्रा येथे काही माजी सैनिकांची भेट घेतली आणि हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला, यामुळेच दबाव निर्माण होऊन सरकारने कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला”, असेही रमेश म्हणाले.

मात्र काँग्रेसच्या या दाव्याला भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे. “काँग्रेस नेते जयराम रमेश यांना 'वन रँक वन पेन्शन'योजनेचे क्रेडीट हवे आहे. त्यांनी आता ‘भारत जोडो’ यात्रेला ‘क्रेडीट लेलो’ यात्रा म्हणायला हवं. ४३ वर्ष वन रँक वन पेन्शन लागू न करणे, राफेल आणि बुलेटप्रूफ जॅकेटला विरोध करणे, सैनिकांचे मनोबल खच्चीकरण करणे, या सर्वांचं श्रेय काँग्रेसलाच द्यायला हवं”, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT