Congress Criticized PM Modi : Sarkarnama
देश

Congress Criticized PM Modi : नरेंद्र मोदी अस्वस्थ ; करिष्मा टिकवण्यासाठी आणखी एक 'जुमला' : काँग्रेसचा घणाघात

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे अस्वस्थ वाटत असल्याने आपली प्रतिमा वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळावा आयोजित करत आहेत. अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, हा सर्वात मोठा जुमला (पोकळ आश्वासन) असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ट्विट करत जयराम रमेश यांनी थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. "पंतप्रधान मोदींनी सोमवारी रोजगार मेळाव्यात तरुणांना विशेषत: सुरक्षा दलात भरतीसाठी 51,000 हून अधिक पत्रांचे वाटप केले. यावर टीका करताना जयराम रमेश म्हणाले, पंतप्रधान दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात "अपयशी" ठरले

दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यानंतर, मोदी सरकारने, नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने तयार केलेला जीएसटी आणि कोणतीही तयारी नसल्यामुळे लहान, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले. अचानक लॉकडाऊन लादून, तरुणांच्या आशा- आकांक्षा धुळीस मिळवल्या. त्यानंतर आता निवडणुकीच्या या वर्षात पंतप्रधानांची परिस्थिती कठीण होऊन बसली आहे.

"त्यांची कलंकित प्रतिमा वाचवण्यासाठी त्यांनी 'प्रधानमंत्री रोजगार मेळावा' आणला आहे. रोजगार मेळाव्यात मिळणाऱ्या नोकऱ्या या आधीच मंजूर झालेल्या पदांच्या विरोधात आहेत. ज्या प्रशासकीय किंवा आर्थिक कारणांमुळे वर्षानुवर्षे भरल्या गेल्या नाहीत. त्यात प्रमोशन प्रकरणातही पंतप्रधानांकडून मोठ्या प्रमाणात नियुक्ती पत्रांचे वाटप केले जात आहे".

सरकार या मेळाव्यांचा वैयक्तिक वापर करत आहे. केवळ पंतप्रधानांमुळेच या नोकऱ्या दिल्या जात आहेत, असे दाखवले जात आहे. पण प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे. आर्थिक गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती होते. त्यासाठी भरीव गुंतवणूक आवश्यक आहे.

तसेच, “पंतप्रधान रोजगार मेळावा ही केवळ नौटंकी आहे. अत्यंत अहंकारीपणा, आडमुठेपणा, आत्ममग्नता तसेच बेरोजगारीच्या भीषण स्थितीची जबाबदारी स्वीकारण्यास नकार देण्याचा हा आणखी एक पुरावा आहे." अशीही टीका जयराम रमेश यांनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT